Dhairyashil Mohite Patil, Akluj : "एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं. निवडणुकीला उभा राहणार असाल तर गावात यायचं. नाहीतर वापस जावा. करमाळा तालुक्यातील गाव होतं. त्यानंतर जाईल तिथे असंच सुरु झालं. मी रोज मोठ्या दादांना येऊन सांगत होतो. त्यानंतर लोकांनी वेदना सांगण्यास सुरुवात केली. पाण्याची परिस्थिती काय आहे हे सांगितलं. त्यादिवशी ठरवले की माझ्यासाठी नाही तर लोकासाठी उभं राहायचं. घरचा कारभारी नीट असला तर घर नीट चालतं. माढा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे. चांगला कारभार करण्यासाठी सहकार महर्षीनींही शिकवण दिली आणि मोठ्या दादांनीही दिली. जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा, हे शिकवलंय", असं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) म्हणाले. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते. 


हे सांगतेत मी पाणीदार खासदार आहे


धैर्यशील मोहिते म्हणाले, निरा देवघरच धरणाची मंजुरी करायची होती. 80 च्या दशकात निलंगेकर साहेबांकडून धरण मंजूर करुन घेतलं. नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी योगदान दिलं. त्यानंतर विदर्भाचा अनुशेष निघाला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व योजनांवर राज्यपालांनी बंदी घातली. आता तिकडचा अनुशेष दूर झाला. ज्याला 1 लाख मतं दिली, त्याचं काम होतं मोठ्या दादांना बैठकीला न्यायचे. पण दादांना नेले नाही. तेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आली नव्हती. फायली तयार ठेवल्या होत्या. फक्त पुढ ढकलायचे काम होते. हे सांगतेत मी पाणीदार खासदार आहे, असा टोला धैर्यशील मोहितेंनी रणजित निंबाळकरांना लगावला. 


दिवाळीत मी इच्छा व्यक्त केली होती 


पुढे बोलताना धैर्यशील मोहिते म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण दादांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सहा जिल्हे आणि 31 तालुक्यांसाठी योजना आहे, त्याला सुद्धा विरोध केला. प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची. मोठ्या दादांना आणि रणजितदादांना क्रेडिट मिळू नये, यासाठी प्रयत्न करायचा. ज्यांनी मतं टाकली नाहीत, ती माणसं याच्या गाडीमध्ये होती. ज्यांनी मतं टाकली नाहीत, त्यांना पद दिली. दिवाळीत मी इच्छा व्यक्त केली की, मी निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. त्यानंतर मी सगळ्या मतदारसंघात फिरु लागलो. त्यानंतर 13 मार्चच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली. मग म्हटलं घरी बसुयात. पुढच्यावेळी पाहुया. पण माढा लोकसभा मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते त्या प्रत्येकांनी मोठ्या दादांना भेटण्यास सुरुवात केली. भैय्याला भेटण्यास पाठवा असं सांगितलं. यांनी प्रत्येक गावात काय करुन ठेवलय, याची उजळणी करुन दिली, असंही धैर्यशील यांनी नमूदं केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar: शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग, आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर तुतारी हाती धरणार