Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील साकोलीमध्ये सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.


आज देशासह जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024) पार पडत आहेत. त्यातच आज अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेसवर (Congress) घणाघाती टीका केली आहे.  काँग्रेसकडून बाबासाहेबांच्या नावाचा वापर मतं मागण्यासाठी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचे काम केले


अमित शाह म्हणाले की,  काँग्रेस बाबासाहेबांचे नाव घेऊन मतं मागत आहे. 1954 मध्ये याच काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचे काम केले होते. त्यासाठी काँग्रेसने मतदारांना 1 रुपये आमिष म्हणून दिले होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक वर्ष भारतरत्न दिले नव्हते, अशीही टीका त्यांनी केली. 


अमित शाहांची राहुल गांधींवर टीका 


अमित शाह पुढे म्हणाले की, काँग्रेस खोटं बोलत आहे की, भाजपला 400 पार एवढा बहुमत मिळाले, तर हे आरक्षण संपवून टाकतील. राहुल बाबा आम्हाला दोन वेळेला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मात्र, कधीही आम्ही आमच्या बहुमताचा वापर आरक्षण हटवण्यासाठी केलेला नाही. उलट आम्ही बहुमताचा वापर धारा 370 हटवण्यासाठी केला. आम्ही आमच्या बहुमताचा वापर ट्रिपल तलाक बंद करण्यासाठी केला, अशी टीका त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मी आज गोंदिया भंडारामध्ये आश्वासन देतो की, जोवर भाजप राजकारणामध्ये आहे. तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणालाही हटवू देखील देणार नाही, असेही ते म्हणाले. 


काँग्रेसकडून राम मंदिराच्या मुद्द्याला अनेक वर्ष आडकाठी


काँग्रेसने अनेक वर्ष राम मंदिराच्या मुद्द्याला आडकाठी केली आहे. मात्र मोदींनी पाच वर्षाच्या काळात न्यायालयातून निर्णयही आणला, भूमिपूजन केलं आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा करून टाकली. आता श्रीराम 500 वर्षानंतर आपला जन्मदिवस भव्य मंदिरात साजरा करणार आहेत. मोदींनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केलं, असेही त्यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Madha Loksabha: माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, उत्तम जानकरांसाठी बारामतीला खास विमान, सागर बंगल्यावरुन थेट अमित शाहांकडे जाणार


Jitendra Awhad: अजितदादांनी आम्हाला ठरवून भाजपमध्ये पाठवलं, नंतर स्वत:ही आले; मल्हार पाटलांच्या वक्तव्याने गुपित फुटलं?