एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

मुख्यमंत्र्यांचे आपल्यावर खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.

मुंबई : राज्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरही (Missing link) दरड कोसळल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून विरोधकांनी, नेटीझन्सने सत्ताधारी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत बोलताना विरोधकांवर जोरदार पलटवार केला. तसेच, एक कोटी खोटारडे मेल्यानंतर हे लोक पैदा झाले आहेत, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. तसेच, माझी बदनाम करा पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, अशा इशाराही मुख्यमंत्र्‍यांनी दिला. त्यावरुन, विरोधकांनी पलटवार केला असून तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटलं.  

मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहातून दिलेल्या इशाऱ्यानंतर विरोधकांनी देवेद्र फडणवीस यांच्यावर पटलवार केला. मुख्यमंत्र्यांचे आपल्यावर खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही असं कोण म्हटलं होतं? काल नाशिकमध्ये ढगफुटी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र, ढगफुटी पाऊस झाला नाही, याचा अर्थ खोट कोण बोलतं, यावरुन लक्षात येते, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला. 

भास्कर जाधव यांनीही फडणवीसांना उत्तर दिले.  एकेकाळी तुम्ही देखील विरोधी पक्षनेते होता, तेव्हा तुम्ही किती आरोप करत होता. कोव्हिड काळात तुम्ही उद्धव ठाकरेंवर किती आरोप केले?  सकाळी आशिष शेलार, 11 वाजता लाड-दरेकर, दुपारी 2 वाजता चंद्रकांत दादा, दुपारी 4 वाजता देवेंद्र फडणवीस स्वत: पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा तुम्ही बेछूट करत असलेले आरोप दिसले नाही का? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.  

पहाटेच्या शपथविधी महाराष्ट्राचा सन्मान वाढवला का? - अंधारे

मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहाच्या पटलावर कुत्ते, भाडे के टट्टू आणि तत्सम अतिशय सभ्य आणि संसदीय शब्दांमध्ये मोठमोठ्याने दरडावून सांगितले की, महाराष्ट्राची बदनामी करू नका. पहाटेचा शपथविधी किंवा ज्यांना चक्की पिसायला लागेल म्हणाले आणि ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना मांडीला मांडी लावून बसवून घेणारे कोण होते आणि त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान केला की सन्मान वाढवला हे त्याच सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड सांगण्याचे कष्ट मुख्यमंत्री महोदय घेतील का?, असा सवाल शिवसेना उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी विचारला. 

अजित पवारांचा विसर पडला - मिटकरी

देवेंद्र फडणवीसजी, मिसिंग लिंक ( कनेक्टिंग लिंक) वर तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांना आज सभागृहात ऑन रेकॉर्ड सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केल्याबद्दल प्रथमत: आपले मनापासून आभार. मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यामध्ये आपले व एकनाथ शिंदे यांचे योगदान जसे नाकारता येऊ शकत नाही तसेच आपल्या खांद्याला खांदा लाऊन युती सरकारमध्ये प्रामाणिक पणे या मिसिंग लिंक प्रकल्प उभारणीत काम करणाऱ्या अजितदादांना नाकारून चालणार नाही. आपण इतक्या लवकर दादांना कसे विसरू शकता? त्यांच यात काहीच योगदान नव्हत का ? आज सभागृहात दादांचे स्मरण झाले असते तर आम्ही कायम आपल्या चरणावर नतमस्तक झालो असतो. मात्र तसे झाले नाही, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी सभागृहात अजित पवारांचा उल्लेख न झाल्याने नाराजी व्यक्त केली. 

मिसिंग लिंकला अजित पवारांचे नाव द्या

तुम्ही आदरणीय दादांना मित्र मानत होता ना, मग असा विसर कसा पडला? आज सभागृहात आपण दादांना विसरलात ही वेदना महाराष्ट्राच्या मनात खोलवर घाव करून गेली आहे . आपल्याला एक विनंती या मिसिंग लिंकला अजित दादांचे नाव देऊन दादांशी असलेली मैत्री स्मरणात ठेवत झालेली चुक दुरुस्त करावी अर्थात मिसिंग लिंक मधून मिस झालेल्या अजितदादाचे नाव कायम स्मरणात ठेवावे, असा सल्ला देखील मिटकरींनी दिला आहे.

हेही वाचा

पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget