PM Devendra Fadnavis: मी शरद पवार पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहिलेलं, पण आजघडीला देवेंद्र फडणवीसच त्यासाठी योग्य: रामराजे नाईक निंबाळकर
PM Devendra Fadnavis: 19 डिसेंबरची घटिका जवळ आली, महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एका मुरब्बी नेता म्हणाला, देवेंद्र फडणवीस हेच पंतप्रधानपासाठी योग्य व्यक्ती.

PM Devendra Fadnavis: मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत, हे स्वप्न बघितलेला कार्यकर्ता आहे. पण माझंही म्हणणं आहे की, महाराष्ट्रातील आताच्या घटकेला पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. ते महाराष्ट्रातील आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेत आहे, त्यांचे (भाजप) नेते आहेत म्हणून नाही, असे वक्तव्य गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राचे राजकारण जवळून पाहिलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केले. ते नुकत्याच फलटणमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात मी 2029 मध्ये महाराष्ट्रातच असल्याचे सांगितले होते. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव पंतप्रधान (PM Devendra Fadnavis) म्हणून अचानक चर्चेत आले आहे. पंतप्रधान मोदी पायउतार झाल्यानंतर त्यांची जागा घेणारे नेते म्हणून आतापर्यंत अमित शाह (Amit Shah) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु, या शर्यतीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जाऊ लागल्याने महाराष्ट्रातील राजकारणात रस घेणाऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला एपस्टीन फाईल्समुळे देशाच्या राजकारणात उलथापालथ होईल, असा दावा केला होता. 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले होते. त्याच्याकडे जगातील अनेक बड्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राजी नव्हते. मात्र, जनमताच्या दबावामुळे त्यांना या फाईल्स सार्वजनिक कराव्या लागणार आहेत. 19 डिसेंबरला यापैकी काही फोटो आणि ईमेल सार्वजनिक केले जातील. यामध्ये भारतातील काही व्यक्तींचा समावेश असू शकतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. त्यामुळे 19 डिसेंबरला देशात राजकीय उलथापालथ झाली तर पंतप्रधान पदासाठी संधी ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतील कोणाला मिळण्याचा काही विषय नाही कारण आमची संख्या तेवढी नाही, तर नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवविले होते.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. याशिवाय, राजकारणात ज्यांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे, अशा नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा























