Devendra Fadnavis : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis on Bopdev Ghat Incident : बोपदेव घाट प्रकरणतील
Devendra Fadnavis on Bopdev Ghat Incident : काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता पोलिसांना 9 दिवसांनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. दरम्यान, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
🕓 4.12pm | 11-10-2024📍Pune.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2024
LIVE | Media interaction#Maharashtra #Pune https://t.co/YKsWxjzVpQ
देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
बोपदेव अत्याचार प्रकरणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी अतिशय मेहनत करुन जी काळीमा फासणारी घटना घडली होती, त्यातील एका आरोपीला अटक केली आहे. अजून दोन आरोपी त्याठिकाणी मिळतील. कारण त्यांची देखील बऱ्यापैकी माहिती प्राप्त झालेली आहे. प्राथमिक चौकशी झाल्यानंतर आयुक्तांनी सांगितलं की, हे सराईत गुन्हेगार दिसत आहेत. डिजीटल एव्हिडंस सापडू नये, असा प्रयत्न केलाय. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात टीम तयार केल्या होत्या. जवळपास 700 पोलीस यांचा शोध घेत होते. टेक्नोलॉजीचा वापर करुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेतलाय. गुन्हेगारांना जेवढ्या लवकरात लवकर शिक्षा देता येईल, असा प्रयत्न आमचा असणार आहे.
पिंपरी चिंचवडला नवे आयुक्तालय करण्यासाठी आपण 25 एकर जमीन दिली - फडणीस
पुण्यात आज नव्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यात आलं. दोन हजार सहाशे नवीन कॅमेरे बसवण्यात आले. सीसीटिव्ही फेस टू चा शुभारंभ करण्यात आला. पुण्यात एकाच वेळी सात पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये चार पोलीस स्टेशन , मीरा भाईंदरमध्ये दोन पोलीस स्टेशनची देखील सुरुवात करण्यात आली. फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या संगणकीकरणाचा शुभारंभ देखील करण्यात आला. पिंपरी चिंचवडला नवे आयुक्तालय करण्यासाठी आपण 25 एकर जमीन दिलेली आहे. लवकरच त्याचंही बांधकाम आपण सुरु करणार आहोत. पोलिसांच्या कामात आपण गुणात्मक बदल करत आहोत. विशेषत: 1960 नंतर 2023 साली नवा आकृतीबंध आपण तयार केला आहे. पोलिसांमध्ये आधुनिकीकरण आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
Navi Mumbai Airport will be a significant gift for Maharashtra and the MMR. This airport, designed for 9 crore passengers, will showcase the essence of modern India.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2024
नवी मुंबई एयरपोर्ट महाराष्ट्र और एमएमआर के लिए एक बड़ी सौगात साबित होगा। 9 करोड़ यात्रियों के लिए सुसज्जित यह… pic.twitter.com/RTFYjqOgmG
इतर महत्त्वाच्या बातम्या