एक्स्प्लोर

Devendra Fadnavis & Raj Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी सगळे दोर कापले, राज ठाकरेंबाबत महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

Devendra Fadnavis & Raj Thackeray: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. त्यानंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या जवळीकीची चर्चा रंगली होती.

Devendra Fadnavis & Raj Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवेल. एखादा नेता मला भेटला यावरुन राजकार होत नसते, असे वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे हे महायुतीसोबत राहतील, याबाबतच्या उरल्यासुरल्या आशा संपवून टाकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी उभय नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली होती. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांनी एकट्या उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आपल्यासोबत येतील, याबाबत भाजप नेत्यांना अजूनही आशा आहे, असे बोलले जात होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य करणे टाळले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली म्हणून राजकीय समीकरणं बदलत नाहीत, असे सांगत युतीच्या शक्यतेचे सर्व दोर कापून टाकले आहेत.

लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण येऊन भेटतो यावरुन युती ठरत नाही किंवा त्यावरुन राजकारणही होत नसते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढेल आणि महायुतीच जिंकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला होता. याविषयी देवेंद्र फडणवीसांना विचारताच त्यांनी या दाव्याची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले की, मला एक गालिबचा शेर आठवतो. गालिबने म्हटले होते की, 'दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है...' मी यावर एवढेच बोलेन. जोवर सत्य स्वीकारणार नाही, तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील. 2014 मध्ये मोदी जिंकले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. 15 - 15 वर्षांपासून सत्ता होती. जोवर विरोधक विचार करणार नाही की आपण का हरतो आहे, जनतेने आपल्याला का नाकारले आहे, याचा अभ्यास न  करता छाती बडवण्याचा काम करतील, तोवर हे जिंकणार नाहीत. विरोधक लोकांचा अपमान करतील तोपर्यंत निवडून येणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन यश मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनतील तब्बल 26 लाभ लाभार्थी बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आमची चौकशी सुरु आहे. जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांचा लाभ बंद केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

तिकडे राहुल गांधींनी एल्गार पुकारला, इकडे राज-उद्धव ठाकरेही सावध झाले, कार्यकर्त्यांना विशेष सूचना, म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget