Devendra Fadnavis: युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी माफी मागावी : देवेंद्र फडणवीस
कंत्राटी भरतीमुळे आरक्षणालाच कात्री लागते अशी टीका होत असताना फडणवीसांनी जीआरच रद्द करत या टीकेतली हवाही काढून टाकलीय. त्यामुळे फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जातंय.
मुंबई : राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा (contract Recruitment) जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं (Sharad Pawar) आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच कंत्राटी भरतीसाठी नियुक्त झालेल्या 9 कंपन्या या मागच्या सरकारच्या काळात नियुक्त झाल्या असं फडणवीस म्हणाले. एकीकडे कंत्राटी भरतीमुळे आरक्षणालाच कात्री लागते अशी टीका होत असताना फडणवीसांनी जीआरच रद्द करत या टीकेतली हवाही काढून टाकलीय. त्यामुळे फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जातंय.
कंत्राटी भरतीला उद्धव ठाकरेंच्या सरकारने मान्यता 2022 साली दिली. बाह्य यंत्रणेकडून गट ब गट क पदे भरण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करणेबाबत पत्र व्यवहार केला आहे. 15 वर्षसाठी ही एजन्सी काम करणार होत्या. जास्त दराने हे काम या एजन्सीला देण्यात आले. आमच्या मंत्रिमंडळाने हे दर 25 टक्क्यांनी कमी केले. आता हे या सगळ्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांना लाजा पण वाटत नाही. युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांची केली आहे. माफी मागितली नाहीतर आम्हला विरोधकांचे पाप जनतेसमोर उघड करावं लागेल, असा देखील इशारा फडणवीसांनी दिला आहे.
ठाकरे सरकारच्या काळाच पोलीस भरती झाली नाही : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Police Bharati)
देवेंद्र फडणवीस म्हणले, पोलीस दलात कंत्राटीभरती बद्दल शरद पवार बोलले. तीन वर्षात ठाकरे सरकारच्या काळात पोलीस भरती झाली नव्हती . आम्ही मुंबई सात हजार पोलिसांची भरती केली. तीन वर्षाची भरती एकत्र करत आहोत. प्रशिक्षणाची सुविधा नसताना आम्ही तयार केली मुंबईला दशाहवादाचा धोका असतो, तरी देखील महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरती केली नाही. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 3 हजार पोलीस हे मुंबईत काम करतील असा फक्त जीआर काढला आहे. तीन हजार पोलिसांचा पगार मुंबई पोलीस आस्थापनेतून होईल असा हा जीआर आहे. याला विरोधक म्हणतात की ही कंत्राटी भरती आहे.
विरोधकांचा चेहरा आम्ही उघडा पाडला : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Opposition)
विरोधकांचा चेहरा आम्ही उघडा पाडला आहे. आमच्या काळात कंत्राटी पद्धती झालेली नाही आमच्याकडे फक्त हा विषय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आला होता. नऊ कंपन्यांकडून जी भरती होणार होती ती रद्द केली आहे . फॅसिलिटी मॅनेजमेंट चा जीआर होता तो रद्द करण्यात आले आहे.
हे ही वाचा :