एक्स्प्लोर

अमित शाहांसह दिग्गजांचे फोन, दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद; असा साजरा झाला देवेंद्र फडणवीसांचा बर्थ डे

सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा केला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांचा आज वाढदिवस. राजकारणातील दोन्ही दिग्गजांचा एकाच दिवशी वाढदिवस हा निव्वळ योगायोग. मात्र, आज दोन्ही नेत्यांना वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे मुंबईतच (mumbai) आहेत. अजित पवार यांना आज दुपारी चिमुकल्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर देवेंद्र फडणवीसांनाही दिव्यांग संस्थेतील बाल-गोपाळांनी फोन करुन वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला वाढदिवस (Birthday) अत्यंत साधेपणाने साजरा केला. पेणमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केला असता, त्याला तत्काळ प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी या दिव्यांग मुलांशी फोनवरुन संवाद साधला. व्हि़डिओ कॉलद्वारे त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत सर्वांची मने जिंकली.

सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा केला. देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिव्यांगाच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात. आमच्या संस्थेला सुद्धा त्यांनी मोठी मदत केली, असे सांगत या मुलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा आग्रह धरला. त्यांच्या विनंतीला फडणवीस यांनी मान देत त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे आभार मानले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांना देशभरातील नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री अमित शाह, उपराष्ट्रपती जयदीप धनगड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, हरदीपसिंग पुरी, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, अभिनेते प्रसाद ओक, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या.

गडकरींसह या नेत्यांकडून शुभेच्छा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंग चौहान, रामदास आठवले, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, अर्जून राम मेघवाल, प्रतापराव जाधव, डॉ. जितेंद्र सिंग, जी. किशन रेड्डी, किरण रिजिजू, अन्नपुर्णा देवी, ज्युएल ओराम, प्रल्हाद जोशी, डॉ. वीरेंद्र कुमार, सर्वानंद सोनोवाल, जितनराम मांझी, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा

मोठा ट्विस्ट! राहत फतह अली खान यांनीच अटकेचं वृत्त फेटाळलं; पाकिस्तानी गायकाने सत्य सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget