टेबल न्यूज, टेबल न्यूज, टेबल न्यूज, जागांच्या त्यागाच्या बातमीवर दादांचं उत्तर, शिंदेही म्हणाले, आमच्यातच लावू नका!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले आहे. अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या (BJP) राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) मुख्यमंत्री शिंदेंना (CM Eknath Shinde) करून दिली. जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धरलाय. 'मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी तेव्हा त्याग केला' असं अमित शाहांनी शिंदेंना सुनावल्याच्या चर्चांना उधान आले आहे. यासंदर्भाचे वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) फेटाळले आहे. अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हा थेट युक्तीवाद केला अशा चर्चांना उधाण आले आहे, याविषयी बोलताना
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही ऐकलय का असे कुठे? तुम्ही त्या बैठकीत होते का? हे असे कोणी कुठे बोलले नाही आणि आम्ही ऐकले नाही.... तुम्ही आमच्यामध्येच लावा...
- देवेंद्र फडणवीस म्हणाले, या बैठकीत आमच्याशिवाय दुसरा कोणी नाही.. मला तर आश्चर्यच वाटते...100 टक्के असे कोठे बोलणे नाही आणि असे काही नाही..
- अजित पवार म्हणाले, टेबल न्यूज... टेबल न्यूज... टेबल न्यूज चला पुढे...
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री स्वत: इथे बसले आहेत. विरोधकांनी आधी त्यांचा चेहरा द्यावा.
अमित शाह काय म्हणाले?
अमित शाह म्हणाले, शिंदेजी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या..
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता
महायुतीतील एका बड्या नेत्याने एबीपी माझाला ही माहिती दिलीय. मात्र, आता जागावाटपाच्या या वाटाघाटीत शिंदे काय करणार? मविआचं जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेकडून जास्त जागांवर दावा करण्यात आला आहे. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत जागावाटपासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करणार बैठक होणार आहे. बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे
हे ही वाचा :
Amit Shah : मुख्यमंत्रिपद देताना आम्ही त्याग केला, जागावाटपात तुम्ही झुकतं माप द्यावं; अमित शाहांचा शिंदेंना आग्रह, सूत्रांची माहिती