Dattatray Bharne, Indapur : "ही निवडणूक प्रपंचाची आहे. नीरा देवधरचे पाणी गेलं तर आपल्याला पाणी मिळणार नाही. पाणी महायुतीच देऊ शकते. अजितदादाच देऊ शकतात. जर पाणी मिळालं नाही, तर आपला प्रपंच रस्त्यावर येईल. उद्या आपल्या घरातील पोरगी कुणी करणार नाही. गैरसमज निर्माण करू नका,कार्यकर्त्यांनी एकमेकांना मान द्यावा. तुमची एक चूक आपल्याला फार महागात पडणार आहे. जिरवा जीवरी नंतर करा, आधी पाण्याचा विचार करा", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले. इंदापूरच्या (Indapur) लाखेवाडी येथे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सभा पार पडली. यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, आमदार दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 


... तर आमच्याकडचे लोक ऊस तोडायला येणार नाहीत


धनंजय मुंडे म्हणाले, देशातील 33 पक्ष मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत. एका बॅट्समनला पराभूत करण्यासाठी 33 फिल्डर पुढे आले आहेत. पण  66 फिल्डर जरी उभे केले तरी मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील. दुसऱ्या देशाच्या मंत्री जर पीएम मोदींच्या विरोधात बोलला, तर त्या देशाच्या पंतप्रधानाला त्या मंत्र्याचा राजीनाम घ्यावा लागतो. तुमच्या शेतीला पाणी मिळालं तर तुमचे पिढ्यानपिढ्या समृद्ध होतील,पण आम्हाला प्यायला पाणी मिळालं तर आमच्याकडचे लोक ऊस तोडायला येणार नाहीत.


साहेबांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधी झाला नव्हता 


2017 ला गणपती बसले त्या दिवशी दिल्लीत विधानसभा लोकसभा सगळं ठरलं. मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा. साहेबांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधी झाला नव्हता,हे मी जबाबदारी पूर्वक बोलतो आहे. मी जर खोटं बोलत असेल तर, माझी ब्रेन मॅपिंग करा. इथं दोन उमेदवार आहेत त्यांचं मला नाव घ्यायचं नाही. आमच्या वहिनी आहेत. 3 टर्म खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय नेत्या संसदरत्न यांनी एकतरी प्रकल्प केला का? हजार महिलांना रोजगार दिला. 2014 ते 19 मी विरोधी पक्ष नेता होतो सगळ्यांच्या विरोधात बोललो कुणाच्या मायला घाबरलो नाही. 2014 ला बिनशर्त भाजपाला पाठिंबा दिला हे संस्कार आहेत, असंही मुंडे यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dhananjay Munde on Sharad Pawar : तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात, धनंजय मुंडेंची शरद पवारांवर जहरी टीका