Dhananjay Munde on Sharad Pawar, Indapur : "दिलेला शब्द पूर्ण करणारा एकमेव नेता महाराष्ट्रात तो म्हणजे अजितदादा पवार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र, मराठवाडा पुढे येईल. सुनेला परकी म्हणता, तुमच्याही घरात देखील लेकी आहेत. एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वेळ वाईट कोणावर येऊ नये. तुम्ही इतकं निगरघट्ट कसे झाला की सूनेला परके म्हणू लागलात",असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. इंदापूरच्या लाखेवाडी येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सभा पार पडली. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 


देशातील 33 पक्ष मोदींना पाडण्यासाठी एकत्र आलेत


धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्याकडून उरले तर बीडला पाणी सोडा. बीडची लोकसभा माझी बहिण लढते आहे. माझं राष्ट्रवादी वर प्रेम आहे. त्यामुळे माझा वेळ घालवू नका. दोनच बातम्या झाल्या पाहिजेत तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले आणि बारामतीच्या खासदार सुनेत्रा वहिनी झाल्या. सुनेत्रा पवार यांना दलित महासंघाने पाठिंबा दिला त्यांच्या आभार मानतो. देशातील 33 पक्ष मोदींना पाडण्यासाठी एकत्र आलेत. एका बॅट्समनला आऊट करण्यासाठी ते 33 फिल्डर लावलेत, असंही मुंडे यांनी सांगितलं. 


66 फिल्डर जरी उभे केले तरी मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील


पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 66 फिल्डर जरी उभे केले तरी मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील. दुसऱ्या देशाचा मंत्री जरी मोदींच्या विरोधात बोलला तर त्या देशाच्या नेत्याला त्या मंत्राचा राजीनामा घ्यावा लागतो. महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना 12000 वर्षाला देतो. दापुरातल्या बावीस गावामध्ये शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे आणि आमच्या भागात प्यायला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे. तुमच्या शेतीला पाणी मिळालं तर तुमचे पिढ्यानपिढ्या समृद्ध होतील,पण आम्हाला प्यायला पाणी मिळालं तर आमच्याकडचे लोक ऊस तोडायला येणार नाहीत.


मी जर खोटं बोलत असेल तर, माझी ब्रेन मॅपिंग करा


इथं दोन उमेदवार आहेत त्यांचं मला नाव घ्यायचं नाही. आमच्या वहिनी आहेत. 3 टर्म खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय नेत्या संसदरत्न यांनी एकतरी प्रकल्प केला का? हजार महिलांना रोजगार दिला. 2014 ते 19 मी विरोधी पक्ष नेता होतो सगळ्यांच्या विरोधात बोललो कुणाच्या मायला घाबरलो नाही. 2014 ला बिनशर्त भाजपाला पाठिंबा दिला हे संस्कार आहेत. 2017 ला गणपती बसले त्या दिवशी दिल्लीत विधानसभा लोकसभा सगळं ठरलं. मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा. साहेबांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधी झाला नव्हता हे मी जबाबदारी पूर्वक बोलतो आहे, असंही मुंडे यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मनमोहन सिंगांनी 10 वर्षात 111 पत्रकार परिषदा घेतल्या, शरद पवारांनी आकडेवारी मांडली, मोदींना खोचक टोले लगावले