Gautami Patil : गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का? दोन वाक्यात स्पष्ट उत्तर, म्हणाली...
Dancer Gautami Patil: गौतमी बुधवारी एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने अमरावतीमध्ये (Amravati) आली होती. यावेळी तिला राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारण्यात आले. गौतमीन राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
अमरावती: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना अमरावतीमधील एका कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी गौतमी पाटील (Gautami Patil) याने मी राजकारणात कधीच प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले.
अमरावतीमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर तिला विचारण्यात आलं की, तुमची लोकप्रियता एखाद्या राजकीय नेत्याइतकी आहे. मग तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केलाय का, तुमचा तसा काही विचार आहे का, असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला. यावर गौतमी पाटीलने म्हटले की, मी अगोदरचं म्हटलं आहे की, राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी एक कलाकार आहे. मी कला दाखवते. मी डान्स करते, बाकी नाही. मी राजकारणात अजिबात जाणार नाही, असे गौतमी पाटील हिने सांगितले.
मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे. अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत. संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळतं आहे. मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं. मला सकाळपासून आराम मिळालेला नाही. पण अमरावतीकरांचं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला, असे गौतमीने म्हटले.
गौतमी पाटीलचा तरुण मुलींना लाखमोलाचा सल्ला
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमरावतीमध्येही बाहेरुन अनेक मुलं-मुली शिकायला येतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न गौतमीला विचारण्याता आला. त्यावर गौतमीने म्हटले की, इथे बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की, स्वतःची काळजी घ्या. लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा. कुणाच्या दबावाखाली राहू नका, आवर्जून नडा, असे गौतमी पाटीलने म्हटले.
गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे यांच्या डान्सची जोरदार चर्चा
भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुन विरोधकांनी संदीप धुर्वे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता की,आमचे सर्व तरूण मुले आहेत. जमाव अतिशय मोठा होता. गौतमी पाटील या खूप फेमस आहेत. कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्या सोबत नाचली, असे धुर्वे यांनी म्हटले.
आणखी वाचा