Nana Patole on Mahayuti Report Card : महायुतीकडून राज्यात केलेला विकास कामांचे आज रिपोर्ट कार्ड देण्यात आले आहे. मात्र त्यांनी रिपोर्ट कार्ड नव्हे तर रेट कार्ड द्यायला हवं होतं, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.  गेल्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या (Mahayuti Government) भ्रष्टाचारी सरकारच्या काळात जे रेट निर्माण करून महाराष्ट्राची लूट केली, महाराष्ट्राला गुजरातला विकण्याचे काम केलं. तो रेट कार्ड त्यांनी जाहीर करायला हवा होता. आज ज्या खोट्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे दोन-अडीच वर्षांमध्ये जे काही स्वप्न दाखवले होतं, त्यापेक्षा महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसवून महाराष्ट्र लुटण्याचा काम या महायुतीच्या एकनाथ शिंदे (CM  Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra  Fadnavis), आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारने केलं असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.


महायुती सरकारचा तो रिपोर्ट कार्ड नव्हे तर रेट कार्ड - नाना पटोले


गुजरातला महाराष्ट्र विकण्याचा काम या सरकारने केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारचा तो रिपोर्ट कार्ड नव्हे तर रेट कार्ड आहे, असेही  नाना पटोले म्हणाले. काँग्रेसचे नेते हिरामण खोसकर यांनी नाना पटोले यांच्यावर आक्षेप घेत आपली चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, एखादा माणूस भांबावला असला की त्याबद्दल आम्ही फार काही बोलत नाही. तसेच महाविकास आघाडीकडून येत्या 20 तारखेला उमेदवारांची यादी जाहीर होईल, असेही नाना पटोले म्हणाले. तर आज राज्यातील 84 जागांवर चर्चा होणार असल्याचेही ते म्हणाले.


महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यानंतर महायुतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे  (Maha Yuti Report card Maharashtra ) उद्घाटन आज(ता.16) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. तर तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्याला महायुतीकडून उत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 


दरम्यान, विरोधकांनी आमची टिंगलटवाळी केली, विरोधक गडबडलेले आहेत, ते घाबरलेत असं म्हणणार नाही पण गडबडले आहेत, असं अजित पवार म्हणाले. तर ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.


संबंधित बातम्या 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट