रायगड : मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या (BJP) राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah)  मुख्यमंत्री शिंदेंना (CM Eknath Shinde) करून दिली.  जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धरलाय. 'मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी तेव्हा त्याग केला' असं अमित शाहांनी शिंदेंना सुनावल्याच्या चर्चांना उधान आले आहे.  यासंदर्भाचे वृत्त मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) फेटाळले आहे. अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे असले तरी या बाबत आता महायुतीच्या इतर नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


त्यांनी जसा त्याग केला आहे तसा आम्ही देखील त्याग केला आहे. किंबहुना आम्ही केलेल्या त्यागामुळे आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालंय आणि राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. प्रत्येकाची भूमिका योग्य आहे. अशा शब्दात आमदार भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


कितीही सभा होऊ द्या भरतशेठचं बाजी मारणार! 


राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर सर्वांनी मिळून मिसळून काम करणं गरजेचं आहे. माझ्या मतदार संघातील जनता हे माझं व्हिजन आहे. एकही गाव, एकही वाडी, एकही वस्ती विकासापासून वंचित नाही. लाभाच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहचवल्या असल्याचेही आमदार भरत गोगावले म्हणाले. तर प्रतिस्पर्धी स्नेहल जगताप यांच्यावर भाष्य करताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीच्या सभांची काळजी घेत नाही. कितीही सभा होऊ द्या भरतशेठचं बाजी मारणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला 


रायगडच्या सातही जागा महायुतीच्याच -भरत गोगावले


विधानसभा निवडणुकित लाडक्या बहीण योजनेचा चांगला प्रभाव पडेल. महाविकास आघाडीने कितीही टीका टिपण्णी केली तरी आमचे कार्यकर्ते त्याला सामोरे जातील. तर  श्रीवर्धन मतदारसंघ महायुती संघर्षावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही ठरवलंय, रायगडच्या सातही जागा महायुतीच्याच आहे. आपापल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना सांभाळणे गरजेचे आहे. आम्ही जस खासदारकी ला सांभाळलं, तस त्यांनीही आम्हाला सांभाळावे. काही अडचणी आल्यास आम्ही मिटवू. श्रीवर्धनची जागा आदिती तटकरे यांनाच आम्ही देऊ. आम्ही त्यांच्याविरुद्ध अद्यापही काही बोललो नाही. त्यांनी जर काही केलं तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. असेही भरत गोगावले म्हणाले. 


हे ही वाचा