महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस उद्या आंदोलन, पंतप्रधान भवनाला घेराव घालण्याचा निर्धार
Congress Planned Mass Protest: महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस सतत केंद्र सरकराचा घेराव करत आली आहे. अशातच पुन्हा एकदा काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करायच्या तयारीत आहे.
Congress Planned Mass Protest: महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस सतत केंद्र सरकराचा घेराव करत आली आहे. अशातच पुन्हा एकदा काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करायच्या तयारीत आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस शुक्रवारी म्हणजेच 5 ऑगस्टला देशव्यापी आंदोलन करणार आहे. शुक्रवारी काँग्रेसचे सर्व खासदार सकाळी 11 वाजता संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतेही राष्ट्रपती भवनाकडे कूच करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान भवनाचा ही घेराव करण्याची काँग्रेसची योजना आहे. तत्पूर्वी महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बैठक घेतली.
शुक्रवारी काँग्रेसचे आंदोलन
महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढीविरोधात काँग्रेसने 5 ऑगस्टला मोठ्या आंदोलनाची योजना आखली असून त्यामध्ये पक्ष राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती आखली आहे.
आम्ही मोदींना घाबरत नाही; राहुल गांधी
महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. या मुद्द्यांवरून काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करत आहेत. आज संसदेच्या कॉरिडॉरमध्ये राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना घाबरत नाही. त्यांच्याविरोधात आमचा संघर्ष सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे लोकशाहीविरोधात काम करत आहेत. लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करत राहणार. सरकारविरोधात लोकांच्या मुद्यावर आंदोलन करत राहणार असून सरकारला जे काही करायचे आहे ते त्यांनी करावे.''
इतर महत्वाच्या बातम्या:
- Rahul Gandhi : काय करायचं ते करा, आम्ही मोदींना घाबरत नाही; राहुल गांधीचे आव्हान
- यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये, शुक्रवारी देशभरात करणार आंदोलन
- National Herald Case: ईडीकडून दिल्लीतले यंग इंडियाचे कार्यालय सील, नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई