नागपूरः काँग्रेसने 44 मते घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. मला माहित नाही की त्यांनी पक्षांतर्गत कितीचा कोटा ठरवला होता. मात्र महाविकासआघाडी मध्ये वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे 42 चा कोटा ठरवला होता. एक दोन दिवसात आम्ही माहिती घेतल्यावर यावर भाष्य करु अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. नागपुरात आल्यावर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.


पुढे पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी अधिकृतपणे सांगू शकतो की आम्ही आमचे 51 मत व्यवस्थित वापरले आहे. कुठेही एकही मतचा नुकसान झालेला नाही. आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. मात्र, आम्हाला अपक्षांचे चार ते पाच मिळाले नाही. तसेच एक मत अवैध ठरवले गेले. आमचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही. या सर्वांचा विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही.


मात्र, एक मत आम्हाला जास्त मिळाले. कोणी प्रेम करणाऱ्या व्यक्तीने ते दिले. ठरल्यानुसार काही मत संजय पवारांना दिले होते. तीन पक्षाच्या सरकारमध्ये मतभेद होऊ शकतात. ते एका पक्षाच्या सरकारमध्येही होते. नागपुरात काय सुरू आहे, सर्वांना माहिती आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.


आम्ही सर्व गोष्टींचा विचार करू. कुठे काय झाले. आम्हाला अपक्षांची चार ते पाच मत का मिळाली नाही. तीन ते चार दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. घाई करण्याची गरज नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एकसंध; हरयाणा वगळता दोन राज्यात इतरांची फोडली मते


Sanjay Raut : 'ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे'; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली


Mumbai : भाजपनं मारली बाजी, आज राज्यभर साजरा होणार विजयोत्सव 


देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण...'