Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागताना पाहायला मिळत आहे. यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांची भर पडली आहे. कल्याणमध्ये (Kalyan) नाना पाटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) हे गुरुवारी (25 मे) एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत (Dombivli) येणार आहेत, त्यावेळी कल्याणमध्ये पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर (Banner) त्यांचा भावी मुख्यमंत्री (Future Chief Minister) असा उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमधील (Kalyan) बॅनरवरुन आता एकच चर्चा सुरू आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत.


नाना पटोलेंच्या स्वागतासाठी कल्याणमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री (Future Chief Minister Nana Patole) असा उल्लेख करण्यात आला आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. जयंत पाटील, अजित पवार, आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ आता कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होऊ लागल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत.


महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे  भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले होते, त्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे  देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले, त्यानंतर आता कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचा: