एक्स्प्लोर

Devendra Fadanvis On Rohit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय, देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले रागाच्या भरात...

Devendra Fadanvis On Rohit Pawar: रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. भावनेच्या भरात रोहित पवार असं बोलले असतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadanvis On Rohit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली एग्झिटनं अख्खा देश हळहळला. पण, अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उपस्थित झालेत. एवढँच काय तर, हा नक्की अपघात होता का? अजितदादांचा विमान अपघात घातपात तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी काही व्हिडिओ क्लिप्स आणि काही कागदपत्रे समोर आणत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रोहित पवारांनी पुन्हा शंका उपस्थित केल्यात, पहिल्यांदा तर अजितदादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि वरिष्ठ नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण, सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही, पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केलेली. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला कल्पना देऊन, या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी, असं सांगितलं होतं, त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करुन त्यासंदर्भातलं पत्रही मला पाठवलं आहे... आता सध्या चौकशी सुरू आहे..."

"मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की, यासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती, पूर्ण न होता, आपण जर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले, तर त्यासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ब्लकबॉक्सही सापडलेला आहे, भारतातील चौकशी यंत्रणांवर कोणीही अविश्वास दाखवू नये, भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात... मला असं वाटतं की, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण आपल्या देशातल्या एजन्सीवर आपण अशाप्रकारे कधी अविश्वास दाखवत नाही... या ठिकाणीही दाखवण्याचं कारण नाही... आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते, आपल्या सर्वांनाच असं वाटतंय की, त्यांच्या अपघाताचं पूर्ण सत्य समोर आलं पाहिजे, ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल, हा मला विश्वास आहे... ", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

रोहित पवार काय म्हणालेले? 

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही फुटेज दाखवला आणि म्हणाले, "धुकं हा प्रॉब्लेम होता.  या ठिकाणी एक रेष दिसत आहे. नंतर ब्लास्ट होतो. रनवेजवळ ती लाइन दिसते, ती आग आहे का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.  5 km पेक्षा कमी दृश्यमानता असताना देखील विमान का लँड केले?", असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी visual flight rules बाबत माहिती दिली. "विमानाला डीजीसीएचे स्ट्रीक्ट रूल्स आहेत, की पाच हजार मिटरपर्यंत जोपर्यंत व्हिसिबिलीटी येत नाही, तोपर्यंत विमान उडवायचं नाही.  टेकऑफसुद्धा करता येऊ शकत नाही, असे आदेश देण्यात आले होते", यांसारखे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेले. 

पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis : Rohit Pawar भावनेच्या भरात बोलले असतील, पण चौकशीआधी तर्क लावणं चुकीचं

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget