एक्स्प्लोर

Gen Z Protest Delhi : 'झुरळां'नी धुव्वा उडवला! बघता-बघता राजीनामा पडला; जेन झी आंदोलनाची पूर्ण टाईमलाईन

Gen Z Protest Timeline : नीट पेपरफुटी प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी' आणि तरुणांच्या अभूतपूर्व आंदोलनापुढे झुकत अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपर फुटीप्रकरणात तीव्र जनआक्रोश आणि 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्र सरकारला अखेर एक पाऊल मागे जावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली, मात्र एखाद्या जनआंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाची आणि तरुणांच्या ताकदीची चर्चा आता देशभर रंगली आहे.

CJP Abhijit Dipke  Protest : एका वक्तव्याने रचला आंदोलनाचा पाया

देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान "काही बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात," असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर तरुण वर्गात संतापाची लाट उसळली आणि या आंदोलनाचा पाया रचला गेला. अमेरिकेत शिक्षण घेणारा मराठी तरुण अभिजित दीपके याने 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या नावाने प्रतिकात्मक सोशल मीडिया अकाउंट सुरू केले. अल्पावधीतच या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावरील या क्रांतीने राजकीय वातावरण ढवळून काढले.

Delhi Jantar Mantar Protest : जंतर-मंतर ते संसदेवरील धडक

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले. देशातील तरुणाईने या व्यासपीठाच्या माध्यमातून आपला उद्रेक व्यक्त केला. पोलिसांचा लाठीचार्जचा सामना करत विद्यार्थ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला, ज्याची परिणती अखेर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यात झाली.

Gen Z Protest Timeline : आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम

३ मे : नीट (NEET) २०२६ ची परीक्षा पार पडली.

१२ मे : नीटचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले, परीक्षा रद्द करण्यात आली. लातूरसह देशभरात सीबीआयचे छापे आणि मोठे रॅकेट उघड.

१५ मे : सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे "बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात" असे वक्तव्य, देशभरातून तीव्र संताप.

१६ मे : अभिजित दीपके यांच्याकडून 'कॉकरोच जनता पार्टी'ची (CJP) स्थापना. सोशल मीडियावर तरुणांचा प्रचंड पाठिंबा, CJP चे फॉलोअर्स काँग्रेस-भाजपपेक्षा अधिक झाले.

१६ मे : पेपरफुटीप्रकरणी सीपीजेकडून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची अधिकृत मागणी.

६ जून : अमेरिकेतून अभिजित दीपके भारतात परतले आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाला सुरुवात.

२८ जून : जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण सुरू.

१८ जुलै : पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.

२० जुलै : कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चाची हाक; हजारो तरुण दिल्लीत दाखल. पोलिसांकडून लाठीमार, देशभरातून निषेध.

२० जुलै : सरकार आणि CJP यांच्यात पहिली औपचारिक चर्चा, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम.

२३ जुलै : मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण.

२४ जुलै : CJP आणि सरकारमधील चर्चेत दोन प्रमुख मागण्या मान्य.

२५ जुलै : अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुपूर्द.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget