Chhatrapati Sambhajinagar: राज्यात सध्या आगामी विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे दिसत असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर (sanjay Raut) जोरदार हल्लाबोल केलाय.  शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये संजय राऊत हा दाऊदच्या माणसांसोबत फिरत होता. आधी त्याची चर्चा करा. दाऊदला घेऊन फिरणारे तुम्ही लोक आम्हाला काय सांगता.  असे म्हणत जोपर्यंत ह्या काळ्या मांजरीला महाविकास आघाडीतून कोणी बाहेर काढणार नाही तोपर्यंत हा माणूस कोणाचाही भलं होऊ देणार नाही अशी बोचरी टीका संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवर केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


संजय राऊतांना जोरदार प्रत्यूत्तर


आम्ही कसं जातो ही चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत फर्जची टोपी घालून राहुल गांधी यांना भेटण्याकरता काश्मीरला जात आहेत. यांचे ह्रदय सम्राट राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत.अशी टीकाही त्यांनी केली.


सत्तेत सामील होण्याआधी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अहमद पटेल यांनाही वेश बदलून भेटायला जायचे. ते खोट्या कथा लहून सिनेमे काढत आहेत. एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते. असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना  लगावल्यानंतर शिरसाटांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सिल्वर ओकवर मुजरा घालणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचे काम नाही. अमित शहांनी त्यावेळेस जे काही केलं ते सर्व हिंदुत्ववादासाठी केलं,असेही ते म्हणाले.


उद्धव ठाकरे यांची तब्येत खराब करण्याचा नाद का लागला...


संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांनी पक्षात राहून उद्धव ठाकरे यांची तब्येत खराब करण्यचा नाद लागला असल्याचे सांगत संजय राऊत यांनी उबाठा पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली असा आरोप करत संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.


जोपर्यंत या काळ्या मांजरीला मविआतून काढत नाही...


जोपर्यंत ह्या कळ्या मांजरीला महाविकास आघाडीतून कोणी बाहेर काढणार नाही तोपर्यंत हा माणूस कोणाचाही भलं होऊ देणार नाही अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी राऊतांनी केली आहे. सिल्वर ओकवर मुजरा घालणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचे काम नाही. अमित शहांनी त्यावेळेस जे काही केलं ते सर्व हिंदुत्ववादासाठी केलं,असेही ते म्हणाले.


हेही वाचा:


उमेदवारी मिळवून दाखवाच.., संदिपान भूमरेंसह शिरसाटांचे चंद्रकांत खैरेंना चॅलेंज, म्हणाले...