Chhatrapati Sambhajinagar: राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभेसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. कोणत्या भागातून कोणता उमेदवार द्यायचा यावर स्पर्धा लागली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरेंसह आमदार संजय शिरसाटांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणूक लढणार आणि गद्दारांना हरवणार असं त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं, त्यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी खैरेंना घेरलं आहे.


चंद्रकांत खैरेंची हौस अजून फिटली नाही, त्यांनी फक्त पश्चिम मतदार संघातून उमेदवारी आणून दाखवावी असे चॅलेंज संदिपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना दिलंय. त्यानंतर आपण बघू की कोण कोणाला काढतं. तर खैरे यांनी उमेदवारी मिळवली तरच त्यांचे मातोश्रीवरच वजन किती आहे हे समजेल. असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरे आणि आमदार संजय शिरसाट बोलत होते. यावेळी दोन वेळा खैरेंचा पराभव झाल्यानंतर आधी उमेदवारी मिळवून दाखवा असं चॅलेंज त्यांनी खैरेंना केलंय.


संदिपान भूमरेंची खैरेंवर टीका


चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळवून दाखवण्याचं चॅलेंज करत संदिपान भूमरे म्हणाले, तुम्ही फक्त उमेदवारी आणा त्यातच तुमची पात्रता समजेल आणि त्यानंतर तुम्हाला सांगू की संजय शिरसाट काय आहे म्हणून. खैरे यांची हौस ही फिटूच शकत नाही. त्यांनी आता फक्त नेतेगिरी करावी असा माझा सल्ला आहे. कारण खैरे यांना आता मातोश्रीवर सुद्धा कोणी विचारत नाही आणि त्यांना उमेदवारीच भेटू शकत नाही. जर यदाकदाचित खैरे उभे राहिले तर खैरेच डिपॉझिट आम्ही जप्त करू. असं ते म्हणाले.


संजय शिरसाट म्हणाले...


खैरेंनी आधी त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत, ज्यांनी त्यांना दोनवेळा पराभव केलाय त्यांचा बंदोबस्त करावा असं म्हणत आमच्या बरोबर नाही आधी त्यांच्याबरोबर तुम्हाला लढावं लागेल असे शिरसाट म्हणाले. त्यांनी उमेदवारी मिळवली तरच त्यांचं मातोश्रीवर वजन आहे हे सिद्ध होईल. अन्यथा त्यांचं वजन संपलं म्हणायला काही हरकत नाही असे शिरसाट म्हणाले.


अब्दुल सत्तार पालकमंत्री झाल्याने नाराजी नाही


अब्दुल सत्तार पालकमंत्री झाल्यानंतर संजय शिरसाटांसह संदिपान भूमरे दोघांनाही याबाबत अन्याय झाला आहे का? असे विचारले गेले. त्यावर दोघांनीहीत्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना न्याय देण्याचं काम करतात. अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले.


हेही वाचा:


मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानाचं पान, नरेंद्र मोदी, अमित शाहांसोबत थेट पहिल्या पंक्तीत स्थान!