एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर राडा, शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले, पोलिसांचा लाठीचार्ज

छत्रपती संभाजीनगर शहरात आज आदित्य ठाकरे आले असता भाजप आणि शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाला.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असून  शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले व त्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली आहे. आक्रमक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती आहे. या लाठीचार्जमध्ये काही कार्यकर्तेही जखमी झाले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवा राजकीय घटनांना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज आदित्य ठाकरे आले असता भाजप आणि शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करून काही जणांना ताब्यातही घेतले आहे.

भाजप- शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा

छत्रपती संभाजी नगर मध्ये आदित्य ठाकरे आले असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. या विरोधाला प्रतिउत्तर देत शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजीने वातावरण अधिकच तापले व दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. या घटनेत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. 

अंबादास दानवेंनी भाजपच्या कृतीचा केला निषेध 

छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या राड्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी येऊन भाजपच्या कृतीचा निषेध केला. खाली बसून त्यांनी ठिय्या धरला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना हलवल्याचे समजते. ते म्हणाले, "काल या संदर्भात सिपिंना फोन केला होता पण त्यांनी लक्ष दिल नाही या घटनेला पोलीस जबाबदार आहेत."

छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्याला ठाकरे गटाने विरोध केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. या राड्यात दोन्ही गट एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि जोरदार घोषणाबाजी केली. या घडामोडींमुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या संघर्षामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून छत्रपती संभाजी नगरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

हेही वाचा:

सुप्रियाताईंना घाणेरड्या शिव्या दिल्या, पालकमंत्री बनवलं, मंत्रिमंडळातून लाथ मारुन काढून टाकायला पाहिजे होतं, आदित्य ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्ला

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Jaipur CJP Team Attacked: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Embed widget