एक्स्प्लोर

बावनकुळे आधी म्हणाले मला माहिती नाही, मग बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हजेरी, गिरीशभाऊंच्या कॉलनंतर प्रॉब्लेम सॉल्व!

Chandrashekhar Bawankule on Sudhakar Badgujar : मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द!

Chandrashekhar Bawankule on Sudhakar Badgujar, Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नाशकातील नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी आज (दि.17) भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. मात्र, त्यांच्या प्रवेशापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काहीही माहिती नसल्याचं नमूद केलं होतं. मात्र, दुपारी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावेळी खुद्द चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली आहे. 

पक्ष प्रवेशावेळी सुधाकर बडगुजर काय म्हणाले?

भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना सुधाकर बडगुजर म्हणाले, आज माझा भाजपात प्रवेश झाला. आदराने प्रवेश झाला, त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.  गिरीश भाऊ संकटमोचक आहेत.  आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला.  आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली हे माहिती नाही, मात्र मी निष्पाप आहे. कोव्हिडमध्ये मी चांगलं काम केलं, कोणी बाहेर येत नव्हतं.  मात्र अचानक नीती ते घाला घातला आणि कारवाई केली.  महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल… ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रात सांडपाण्यातून वीज निर्मिती प्रकल्प दिला. तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता, ते दूरदृष्टीचे नेते आहेत. निष्ठेने काम करु आणि परिकाष्ठा करु, असंही बडगुजर यांनी सांगितलं. 

सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर बावनकुळे काय म्हणाले? 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित राज्याचा संकल्प झालाय. आम्ही सर्व कोअर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल.  अधिक ताकदीनं आम्हाला पुढे जाता येईल.  विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संकल्पाला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.  विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश होत असतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला. सकाळी  निघालो तेव्हा वाटलं 2-3 दिवसांनी पक्षप्रवेश ठरेल.  मात्र, आजच मंगळवार असल्याने त्यांनी आज ठरवलं. 

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, मनभेद नाहीत, मतभेद आहेत ते दूर होईल याचा विश्वास आहे. कोणी एखाद्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो, कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचं आहे. ज्या पक्षाला आयुष्य देतो तिथे अपमान होत असेल आणि काळजी होत नसेल तर बरोबर नाही. नाशिकात येतील तेव्हा मेळावा घेऊयात, जे राहिले आहेत त्यांचा पक्षप्रवेश करूयात. भाजप तुमची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देणार नाही.  पक्षात कधी वाटणार नाही कधी की नवीन घरात गेलोय. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत सर्वांनी राहावं इतकीच विनंती करतो.

बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत गिरीश महाजन काय म्हणाले?

गिरीश महाजन म्हणाले, प्रवेश कधी होणार? अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या. आज तो दिवस आलेला आहे.  मी सुधाकर बडगुजर यांचे अभिनंदन करतो.  निवडणुका समोर आहेत, नाशिक बालेकिल्ला आहे.  गेल्या वेळी 68 नगरसेवक होते, आणि आता किती करायचे 100 पार करायचे…आपण सर्व मिळून आता प्रयत्न करूयात.  जास्तीत जास्ती पालिका, परिषदा हाती घ्यायच्या आहेत.  आपण महायुतीत आहोत. 

सुधाकर बडगुजर आणि बावनकुळे यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद होता? 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Macao येथे कुटूंबासोबत गेले असताना त्यांचे कसिनो कसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झाडल्या होत्या.  मी कॅसिनो खळेत नव्हतो असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी त्यावेळीच दिले होते. कुटूंबासोबत आलेलो असताना अशा स्वरूपाचे फोटो व्हायरल करून संभ्रम निर्माण करणे योग्य नसल्याचा पलटवार बावनकुळे यांनी त्याचवेळी केला होता. बडगुजर यांच्या माध्यमातूनच  संजय राऊत यांच्यापर्यंत फोटो  पोहोचवले असे आरोप त्यावेळी करण्यात आले होते. बडगुजर यांचा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आमदार सीना हिरे यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar & Ajit Pawar NCP: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget