Bawankule On Shiv Sena Advertisement : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी : चंद्रशेखर बावनकुळे
Bawankule On Shiv Sena Advertisement : "एकनाथ शिंदे उत्कृष्ट पण फडणवीस यांच्यासोबत तुलना नको. या जाहिरातीमुळे पदाधिकारी दुखावले हे खरं आहे," असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Bawankule On Shiv Sena Advertisement : शिवसेनेचे (Shiv Sena) कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची तुलना अचंबित करणारी आहे. कालचा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आज झाला. पण पुन्हा असं होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जाहिरात वादावर दिली. तसंच थोडे मतभेद झाले पण पण मनभेद नाहीत. दोन सख्ख्या भावांमध्ये देखील मतभेद होतात. शिवसेना आणि भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे मतभेद होणं साहजिक आहे. हा विषय आता संपला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
'शिंदे उत्कृष्ट आहेत पण फडणवीस यांच्याशी तुलना नको'
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "देवेंद्र हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते भाजपचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून त्यांची क्वॉलिटी आहे, अष्टपैलू कामगिरी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना घडवलं. पक्ष वाढवण्यासाठी काम केलंय. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी, आमदार, खासदार यांचं मन दुखावलं आहे. शिंदे उत्कृष्ट आहेत पण फडणवीस यांच्याशी तुलना नको. शिंदे मोठ्या मनाचे माणूस आहेत. ज्यांनी कोणी एकनाथ शिंदेंची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली हे अचंबित करणारं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक असतील. हा विषय आता संपलेला आहे."
शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेणार
"कालचा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आज झाला. हे युतीसाठी, आमच्या आणि त्यांच्या पक्षासाठी चांगलं आहे. आमच्याकडून चूक झाली, आम्ही दुरुस्त करायला पाहिजे, त्यांनी चूक केली तर त्यांच्याकडून दुरुस्त झाली पाहिजे. पण अशा चुका दुरुस्त करुन पुन्हा असं होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याबाबत मी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याशी बोललो आहे. शिंदे आणि फडणवीस लहान-मोठ्या भावासारखं काम करत आहे. अशा परिस्थितीत कोण ठिणगी पाडत आहेत. सरकारला नुकसान करण्यासाठी कोण काम करत आहे, ते यानंतर करुन यासाठी शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी
शिवसेनेकडून (शिंदे गट) काल महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता.
हेही वाचा