Chandrakant Patil, सोलापूर : एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या एक्झिट पोलची चर्चा राज्यभर सुरु असताना राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र याबाबत डबल ढोलकी वाजवण्याचे काम केले. देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत असल्याचे सांगताना हे आनंददायी असल्याचे सांगितले. मात्र लगेचच महाराष्ट्रातील निकालाबाबत बोलताना राज्यात वेगवेगळे कल दाखवले असले तरी महाराष्ट्रात 35 च्या पुढे महायुती जाईल असा दावा पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा परभूत ठरणार असल्याचा अंदाज सांगण्यात आला. त्यानंतर चंद्कांत पाटलांनी अंदाजांवर काही बोलण्यात अर्थ नाही. प्रत्यक्ष निकाल चार तारखेला समोर आल्यावर बोलता येईल अशी प्रतिक्रिया दिली . 


सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत आपण आशावादी आहे


सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत आपण आशावादी आहे, असंही पाटील यांनी सांगितले . मात्र आशावाद हा शब्द चुकल्याचे लक्षात येताच आपण सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकणार यावर ठाम असल्याचे सांगितले . राज्यात महायुतीच्या घटक पक्षांना फटका बसत असल्याचे निदर्शनास आणताच आत्ता असे कोणतेही विश्लेषण करणे बरोबर होणार नाही. खूप कमी जागा दाखवत असले तरी महायुतीला खूप चांगल्या जागा मिळणार असे आपले ठाम मत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चार जूनला महायुतीला खूप चांगल्या जागा मिळालेल्या दिसल्यावर आपले प्रश्न गैरलागू पडतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मोदी सत्तेत येणार म्हटल्यावर एक्झिट पोलवर खुश होणारे चंद्रकांत पाटील राज्याच्या निकालाबाबत मात्र या एक्झिट पोल काहीही दाखवत असले तरी राज्याचे निकाल 4 जूनला दिसतील असे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या 


North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?