ABP Cvoter Exit Poll 2024 :  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) 4 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आता देशातील सातव्या टप्प्यातील अखेरची मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.  यानंतर वेगवेगळ्या माध्यम संस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर येत आहेत. या एक्झिट पोलच्या माध्यमातून देशात कोणाची सत्ता येणार? कोणाला किती जागा मिळणार? याचे अंदाज बांधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी वोटरचा एक्झिट पोल (ABP Cvoter Exit Poll 2024) प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच टीव्ही नाईन पोलस्ट्राटने उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) एकूण आठ लोकसभा मतदारसंघातून कुणाचा विजय होणार? याबाबत अंदाज वर्तवला आहे.

  

महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान पहिल्या टप्प्यात झाले आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढली असून 63.55 टक्के मतदान झाले. तर, चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरुन 59.64 टक्के मतदान झालं आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात ही टक्केवारी आणखी घसरली असून पाचच्या टप्प्यात सर्वात कमी 54.33 टक्के मतदान झाले आहे. देशातील 5 व्या टप्प्यातील मतदानाची सरासरी 60.39 टक्के आहे. तर, महाराष्ट्रातील एकूण 5 टप्प्यातील मतदान 60.78 टक्के आहे.

उत्तर महाराष्ट्रातून 'या' उमेदवारांमध्ये प्रमुख लढत

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरी, जळगाव, नंदुरबार, रावेर, शिर्डी, अहमदनगर, धुळे हे आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख लढत झाली. तर दिंडोरी लोकसभेत भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत झाली.  जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार, नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील, शिर्डी लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. तर धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. 

एबीपी सी वोटर एक्झिट पोल

महायुती

भाजप : 17

शिंदे गट : 6

अजित पवार गट :

महाविकास आघाडी

ठाकरे गट : 9

काँग्रेस : 8

शरद पवार गट : 6

इतर : 1

एनडीए (NDA) : 353-383

इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182

इतर : 4 -12

उत्तर महाराष्ट्रात कोण बाजी मारणार

उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर कोण बाजी मारणार याबाबत टीव्ही नाईन पोलस्ट्राटने अंदाज वर्तवला आहे. तो पुढीलप्रमाणे...

मतदार संघ  उमेदवार आणि पक्ष

एक्झिट पोलनुसार

कोण आघाडीवर

नाशिक 

हेमंत गोडसे - शिवसेना शिंदे गट (महायुती)

राजाभाऊ वाजे - शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

शांतीगिरी महाराज - अपक्ष

राजाभाऊ वाजे 
दिंडोरी

भारती पवार - भाजप (महायुती)

भास्कर भगरे - राष्ट्रवादी शरद पवार गट (महाविकास आघाडी)

भास्कर भगरे 
धुळे 

डॉ. सुभाष भामरे - भाजप (महायुती)

डॉ. शोभा बच्छाव - काँग्रेस (महाविकास आघाडी)

डॉ. सुभाष भामरे 
शिर्डी 

सदाशिव लोखंडे - शिवसेना शिंदे गट (महायुती)

भाऊसाहेब वाकचौरे - शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

भाऊसाहेब वाकचौरे
जळगाव

स्मिता वाघ - भाजप (महायुती)

करण पवार - शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

स्मिता वाघ 
नंदुरबार

हिना गावित - भाजप (महायुती)

गोवाल पाडवी - काँग्रेस (महाविकास आघाडी)

हिना गावित
रावेर 

रक्षा खडसे - भाजप (महायुती)

श्रीराम पाटील - राष्ट्रवादी शरद पवार गट (महाविकास आघाडी)

रक्षा खडसे
अहमदनगर 

डॉ. सुजय विखे पाटील - भाजप   (महायुती)

निलेश लंके - राष्ट्रवादी शरद पवार गट (महाविकास आघाडी)

निलेश लंके

आणखी वाचा

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट; एक्झिट पोल काय सांगतो, पाहा