Chandrakant Patil : राज्यात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रश्मी ठाकरेंच्या (Rashmi thackeray) 19 बंगल्याचा विषय विनाकारण आणला. राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे आणि ते कुणाच्या सांगण्यावरून वागतात हे जगजाहीर आहे असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सोबतच त्यांनी नाव न घेता शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे. 


अनिल परबांना संपादक करा. 
रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परबांना संपादक करा.  सामना मध्ये कशी भाषा वापरली जाते ते आपण पाहतोच असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 


नारायण राणे जर काही बोलले असतील तर...
राज्यात सध्या जे काही चाललय त्याबाबत अँक्शन ला रिएक्शन होतच राहणार असे म्हणावे लागेल. सगळ्यांना कोणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाहीए. अशावेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं. पण ते कसे बोलवणार? नारायण राणे जर काही बोलले असतील तर ते केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे काहीतरी ठोस माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. असे पाटील म्हणाले


 काँग्रेस आणि सेनेला कठपुतली सारखे नाचवणारे कोण?
राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे आणि ते कुणाच्या सांगण्यावरून वागतात हे जगजाहीर आहे. जे महाविकास आघाडीचे कर्तेकरविते आहेत ते सगळ्यांना काँग्रेस आणि सेनेला कठपुतली सारख नाचवते आहेत असे सांगत नाव न घेता शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे. 


पोलीस महासंचालक बदल
या राज्य सरकारने एकही निर्णय घेतलेला नाही. त्यांना वारंवार कोर्टाचे फटके खावे लागत आहेत, तरीही समजत नाही असे पाटील म्हणाले.


सोमय्या-राऊत वाद शिगेला 



भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटत चाललाय. संजय राऊत गेल्या ३ दिवसांपासून आरोपांच्या फैरी झडतायेत, त्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी किरीट सोमय्या पुढे येतायेत. त्यामुळं प्रश्न असा आहे, हे दोघं नेते एकमेकांवर जे आरोपप्रत्यारोप करतायेत ते सर्व आधी सिद्ध करुन दाखवणार? की फक्त एकमेकांना लाखोल्या वाहण्याचा कार्यक्रम सुरु राहणार? 


राऊतांनी सोमय्यांचे दावे फेटाळले


सोमय्या म्हणाले होते, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला. त्यावर आज कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी ही माहिती देत सोमय्यांचा दावा फेटाळून लावला आहे.