Kirit Somaiya Press : अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.


संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधीमी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.


दरम्यान, यावेळी किरीट सोमय्या यांनी कोवीड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. कोवीड सेंटरमधील घोटाळ्याच्या चौकशीची भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असल्याचे सोमय्या म्हणाले. मी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी लढत आहे. मला जर ब्ल्ॅकमेलर म्हणत असतील तर चुकीचे आहे. आजपर्यंत उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. रश्मी ठाकरे बोलल्या नाहीत असे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे बंगले चोरीला गेले की,  ते खोटे बोलतात हे दोनच प्रश्न असल्याचे सोमय्या म्हणाले. तर माझ्याकडे याचे पुरावे असल्याचे ते म्हणाले. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी 19 बंगल्यासंदर्भात ग्रामपंयातीची माफी मागितली आहे. हे पत्र संजय राऊत यांच्याकडे असल्याचे सोमय्या म्हणाले.


रश्मी उद्धव ठाकरेंनी 2014 मध्ये अॅग्रीमेंट रजिस्टर केले आहे. यावेळी त्यांनी घरे असल्याचे पुरावे जोडले आहेत. विशेष म्हणजे हे घर वनखात्याच्या जमिनीवर असल्याचे त्यांनी दाखवले आहे असे सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर खुन्नस काढायचा असेल तर किरीट सोमय्यांचा वापर कशाला करता? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी राऊतांना केला. ठाकरे सरकारने 19 बंगल्यांची चौकशी करावी, पण त्याऐवजी ते किरीट सोमय्या, नील सोमय्या यांना जेलमध्ये जाण्याची भाषा करत असे ते म्हणाले. तुमच्या मुळे कोवीड पेशंटवर अत्याचार झाले असल्याचे सोमय्या म्हणाले.