Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी भेट दिली. दरम्य़ान सोमय्यांनी आज कोर्लई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक होताना दिसले. यावेळी सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. किरीट सोमय्या अलिबागकडे रवाना झाले होते. यावेळी ग्रामसेवक आणि सरपंचाकडून माहिती मिळवली. किरीट सोमय्या जागेची पाहणी करतील असं वाटत होतं पण त्यांनी तसं न करता ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवक आणि सरपंचांकडून माहिती घेतली.
ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? - सोमय्या
ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? मुख्यमंत्री खरे आहेत की नाही याची पडताळणी ग्रामपंचायत करू शकली नाही. कागदोपत्री असलेले बंगले कुणी पाडले असतील तर पोलीसांनी चौकशी करावी, ग्रामस्थांशी व्यवस्थित चर्चा केलीय. अशी माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सोमय्याांना आज केवळ ड्रामेबाजी करायची होती, कोर्लई गावच्या सरपंचाची माहिती
रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात आले होते. कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आहे. सरपंच प्रशांत मिसाळ म्हणतात, किरीट सोमय्या जाणून बुजून हे करत आहेत. माहितीच्या अधिकारातून सोमय्यांनी ही माहिती मागवली, तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे, आज ते ग्रामपंचायत कार्यालयात आले, बसले, आणि काही न बोलता पत्र देऊन गेले. आज फक्त त्यांना ड्रामाबाजी कायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे. हा फक्त गावाला बदनाम करण्याचा डाव आहे. माहितीचा अधिकार सर्वांना आहे, त्यांनी जी माहिती मागितली, ती त्य़ांना देण्यात आली आहे. खोडसाळ वृत्तीने त्यांना ड्रामा करायचा होता.
सोमय्यांचा आरोप
अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता
सोमय्या-राऊत वाद शिगेला
इतर महत्त्वाच्या बातम्या: