BMC Election: इकडे भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पारचा नारा दिला, तिकडे एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
BMC Election: केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

BMC Election: राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Local Body Election) बिगुल वाजणार आहे. त्याची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर (BMC Election) सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनीही रणनिती आखण्यास सुरूवात केली असून, मुंबईतील सत्तेची किल्ली हस्तगत करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एकत्रीकरणामुळे राज्यातील राजकारणात नव्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. ठाकरे ब्रँडला नवी उभारी मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) मुंबई महापालिकेसाठी 150 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.
BMC Election: भाजपची आखणी आणि शिंदे गटासोबतचे समीकरण
केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता मुंबईत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याची योजना तयार करण्यात येत आहे. तर शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Faction) 64 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीचे (मविआ) पारंपरिक प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाल्यास त्याचा थेट फायदा अंदाज भाजपने वर्तवल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गटातील समन्वयाच्या कमतरतेचा लाभ घेण्यासाठी भाजपने सूक्ष्म स्तरावर संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे समजते.
Raj Thackeray Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या समीकरणावरही ठरणार राजकीय गणिते
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची राजकीय युती होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या समीकरणावरही पुढील राजकीय गणिते ठरणार आहेत.
Eknath Shinde: एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना
दरम्यान, भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पारचा नारा देताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या दिल्लीवरीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिंदेंच्या दिल्लीवारीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा

























