विधानसभेसाठी भाजपचा तगडा प्लॅन, पंतप्रधान मोदींसह अमित शाह,गडकरी मैदानात, कोणत्या नेत्याच्या किती सभा?
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरींच्या सभा होणार आहेत.
Maharashtra Assembly Election Bjp Plan : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज नेते सभा घेणार (Public Rally) आहेत. राज्यात भाजपकडून 100 हून अधिक सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभांचं नियोजन करण्यात आलं आहे.
फडणवीस, गडकरी आणि बावनकुळे यांच्यावर अधिक सभांची जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अधिक सभांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही 15 सभा होणार आहेत. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
कोणत्या नेत्यांच्या किती सभा होणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी - 8
अमित शाह - 20
नितीन गडकरी - 40
देवेंद्र फडणवीस - 50
चंद्रशेखर बावनकुळे - 40
योगी आदित्यनाथ - 15