BJP Suspends Nupur Sharma: प्रेषित मुहम्मद यांच्यावर टीका करणं भोवलं, भाजपने नुपूर शर्मा यांना 6 वर्षांसाठी केलं निलंबित
Action Against Nupur Sharma: भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
![BJP Suspends Nupur Sharma: प्रेषित मुहम्मद यांच्यावर टीका करणं भोवलं, भाजपने नुपूर शर्मा यांना 6 वर्षांसाठी केलं निलंबित BJP spokesperson Nupur Sharma has been suspended from primary membership BJP Suspends Nupur Sharma: प्रेषित मुहम्मद यांच्यावर टीका करणं भोवलं, भाजपने नुपूर शर्मा यांना 6 वर्षांसाठी केलं निलंबित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/4db42399fac1a699d59ac0269cd00d88_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Action Against Nupur Sharma: भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. नवीन कुमार जिंदाल यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाने रविवारी नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी एक निवेदन जारी केलं. ज्यात म्हटलं आहे की, भाजप पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणत्याही धर्माच्या आदरणीय लोकांचा अपमान करत नाही. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी हे निवेदन जारी केले होते. यात पुढे म्हटलं आहे की, ''त्यांचा पक्ष कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी कोणतीही कल्पना किंवा विचार स्वीकारत नाही.''
याबाबत जारी निवेदनात अरुण सिंह म्हणाले, ''भाजप अशा कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही किंवा प्रोत्साहन देत नाही. शर्मा यांच्या वक्तव्याबाबत मुस्लिम समाजात संताप व्यक्त होत आहे.'' सिंह म्हणाले, 'भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात प्रत्येक धर्माचा विकास आणि भरभराट झाली आहे. भाजपचा सर्वपंथ समभावावर विश्वास आहे. कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान भाजपला मान्य नाही.''
ते म्हणाले की, ''देशातील संविधानाचीही भारतातील प्रत्येक नागरिकाने सर्व धर्मांचा आदर करावे अशी अपेक्षित आहे. सिंग म्हणाले, 'स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात या अमृत काळात 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही भावना सतत दृढ करत असताना देशाची एकता, अखंडता आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे.''
इतर महत्वाच्या बातम्या:
World Environment Day: शेती रसायनमुक्त होणार, नमामि गंगेला मिळणार नवी ताकद: पंतप्रधान मोदी
Ministry of Tourism : पर्यटन मंत्रालयाच्यावतीनं शाश्वत पर्यटन आणि जबाबदार प्रवासी मोहिमेसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)