एक्स्प्लोर

चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला, काय म्हणाले CM?

चंद्रपूरमध्ये भाजपला महापौरपद मिळेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती मिळणार आहे. काँग्रेसनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती देऊ केली होती.

मुंबई : राज्यमंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत चंद्रपूरमधील (Chandrapur) भाजप-ठाकरेंच्या शिवसेना पाठिंब्यावर भाष्य केलं. तसेच, पुरंदर विमानतळाला मान्यता दिली असून पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केली जाईल, 1 जूनपर्यंत अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर, तिसऱ्या मुंबई संकल्पनेला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील महापौरपदाच्या निवडीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता मला या संदर्भात फार माहीत नाही. चंद्रपूरमध्ये झालेल्या युतीची मी माहिती घेईन, पण चंद्रपूरच्या महापौरांना माझ्या शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

चंद्रपूरमध्ये भाजपला महापौरपद मिळेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती मिळणार आहे. काँग्रेसनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती देऊ केली होती. मात्र, पाच वर्षात महापौरपद मिळणार नसल्यानं भाजपसोबत जाणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी म्हटलं. त्यामुळे, राज्यात एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप-ठाकरेंची युती चंद्रपुरात पाहायला मिळाली. त्यावर, फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया देत महापौरांना शुभेच्छा दिल्या. चंद्रपूर महानगरपालिकेत मंगळवारी ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर झाले आहेत.  

पुणे जिल्ह्यात संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे विमानतळ होणार आहे. त्यासाठी जमीन अधीग्रहण स्वीकारण्यास 96 टक्के लोकांनी मान्यता दिली आहे. अटल सेतू या ठिकाणी काही जमीन एमएमआरडीएला देण्यात आली आहे. ही जमीन अधिग्रहण होईल, त्यामुळे तिसरी मुंबई तयार करता येईल. राज्यातील ⁠सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून नवीन कर्ज घेणार आहे, यालाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, आठ लाख एकर जमीन सिंचनाखाली येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. 

सुनेत्रा पवारांचं औपचारिकपणे स्वागत

अजित पवार यांच्या निधनानंतर शोकप्रस्ताव सादर केला, ⁠औपचारीकपणे सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलं. ⁠राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स केला आहे, पुढे ही होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे म्हणत विलिनीकरणावर बोलणे त्यांनी टाळलं.

कोणाला मळमळ वाटते

राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर टीका केली, त्यावरुन फडणवीसांनी पलटवार केला. ज्या लोकांना निमंत्रण मिळाल नाही ते टीका करतात. ⁠शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून लोकांना माहिती मिळावी, या हेतुने हा कार्यक्रम होता. ⁠ज्या लोकांचा संघाशी संबंध नाही, अशा लोकांनाही बोलवण्यात आलं होतं. ⁠यात कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ वाटते. ⁠ज्यांना बोलवलं नाही त्यांना हे वाटतं, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Maharashtra Government: जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget