एक्स्प्लोर

Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित, घोषणा कधी होणार? संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न

BJP state president Ravindra Chavan: डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही.

मुंबई : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, ही नियुक्ती नववर्षांमध्ये होणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिलमधील निवडणुकांनंतर होईल याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे आत्ताचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलमंत्रिपद मिळाले आहे, त्यानंतर आता रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे स्पष्ट झालं आहे. 

नवीन वर्षात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना आता प्रदेशाध्यक्ष केलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, अशी चर्चा आहे.

रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकिर्द

रविंद्र चव्हाण हे 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.

2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.

2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.

2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.

2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली

ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत सुरुंग लावण्यात रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

पालघरमध्ये ही बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपाचे दोन आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आमदार रविंद्र चव्हाण यांनी निवडून आणला.

पक्षात समतोल साधण्याचा प्रयत्न

चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. दिल्लीतील भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेते तेही तितकेच महत्त्वाचे असेल. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चांगलं महत्त्वाचे स्थान देण्यात आलं आहे. 
त्यानंर आता चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोकणात भाजपला मोठे यश मिळवून देण्यात चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलंChhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धसBajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Eknath Shinde : मोठी बातमी, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार,मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार : एकनाथ शिंदे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
Embed widget