एक्स्प्लोर

Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....

Narayan Rane: नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून काहीही काम न करता फुकट मानधन घेतले. ब्रश न करता संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घेतो, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.

सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील बड्या नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर (PM Post Offer) दिली होती, असे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपमधील (BJP) कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. एकूण भाजपच्या नेत्यांनी काहीशी सावध भूमिका घेतली होती. मात्र, भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. ते रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नितीन गडकरी हे मोठे नेते आणि माझे मित्र आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत केलेले वक्तव्य राजकीय की वैयक्तिक हे मला माहीत नाही. मी त्या विषयावर बोलणार नाही, अशी मोघम प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. त्यानंतर राणे यांनी या विषयावर फारसे बोलण्यास नकार दिला. एकूणच नारायण राणे यांनी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच सावधानतेचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. 

गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधानपदाचा पर्यायी चेहरा म्हणून भाजपमध्ये कोणतेही नेतृ्त्त्व उदयाला आले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्षांच्या कुबड्यांचा आधार घेऊन नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करावे लागले. त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत परिस्थिती बदलेल, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा किस्सा नितीन गडकरी यांनी नेमका आताच सांगून अचूक राजकीय टायमिंग साधले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकते, याची चर्चा अधुनमधून सुरु असते. या शर्यतीमध्ये योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, आता नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक तगड्या चेहऱ्याची भर पडली आहे. 

नितीन गडकरी यांनी नेमके काय म्हटले?

नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना देण्यात आलेल्या पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यांनी म्हटले होते की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी  या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

Nitin Gadkari PM Offer: नितीन गडकरींच्या मनात पंतप्रधानपदाची अभिलाषा, त्यांनी थेट नरेंद्र मोदींना मेसेज दिलाय; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget