Election Result 2022 LIVE: गोव्यात भाजप सरकारचा 14 मार्च रोजी शपथविधी? पाच राज्यातील जलद निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर
Election Result 2022 LIVE Updates: राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा. पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार जाहीर
Pm Modi : 2017 च्या निकालांनी 2019 चं भवितव्य ठरवलं असं विश्लेशकांचं मत होतं. त्यामुळे 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.
Pm Modi : गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास आहे. भाजप सरकार गरीबांसाठी काम करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
Pm Modi : भाजपच्या विजयात महिलांचं मोठं योगदान आहे. जिथं महिलांचा जास्त प्रतिसाद मिळाला, तेथे भाजपचा मोठा विजय झाला आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
Pm Modi : भाजपने प्रशासन यंत्रणा मजबूत केली आणि प्रत्येक काम पारदर्शक केलं. यापुढेही प्रत्येक गरीबापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.
Pm Modi : आजच्या निकालाने भाजपच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपने गरीबांसाठी काम केलं असून त्यामुळे जनतेने आम्हाला विजयी केले. आम्ही देशातील प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
Pm Modi : आज कार्यकर्त्यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. याबरोबरच जनतेच्या आर्शीवादामुळे भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
pm modi : पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. या यशासाठी कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
Election Result 2022 LIVE: पंजाबच्या जनतेचा निर्णय मान्य; माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची प्रतिक्रिया
Election Result 2022 : विजयी पक्षांचे शिवसेनेकडून अभिनंदन - संजय राऊत
परभाव पचवणं सोप्पं असते, विजय पचवायला शिकायला हवं - संजय राऊत
सुडाने राजकारण न करता, लोकांच्या हितासाठी काम करा - संजय राऊत
Goa Election Result : गोव्यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. 14 मार्च रोजी शपथविधी होणार; सूत्रांची माहिती
Punjab Election : पंजाबमधील 'आप' सरकारचा शपथविधी कार्यक्रम भगतसिंह यांच्या गावी होणार
Election Result 2022 LIVE: गोव्यात भाजपचे प्रमोद सावंत आजच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपने सध्या 19 जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि अपक्षांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे.
Election Result 2022 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपचे उमेदावर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. अद्याप संपूर्ण कल हाती आले नाहीत. पण आता आलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टी 60 जागांवर आघाडीवर आहे. तर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे.
हळूहळू पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत पाच राज्यांपैकी भाजपचे उमेदवार चार राज्यात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली आहेय 2017 च्या विधानसबा निवडणुकीत 20 जागा मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आचे 60 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरु आहे.
Goa Election Result 2022 LIVE: गोवा: माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव; भाजपचा विजय
Uttar Pradesh Election Result 2022 LIVE: उत्तर प्रदेश निवडणुकीत मतदारांची 'बसपा'वरील माया आटली, फक्त 5 जागांवर आघाडीवर; बसपाची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी
Election Result 2022 LIVE: गोवा : भाजप बहुमताजवळ, 18 जागांवर आघाडीवर; काँग्रेस 12 जागांवर आणि मगोप 3 जागांवर आघाडीवर
Punjab Election Result : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल यायला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मोठी आघाडी गेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप जवळपास 53 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. तर काँग्रेस पंजाबमध्ये 36 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महत्वाची माहिती म्हणजे पंजबमधील दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पंदाचे उमेदवार असणारे चरणजीत सिंह चन्नी हे पिछाडीवर आहेत. तसेच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे देखील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह हे देखील पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
UP Election Result 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सध्या सुरुवात झाली आहे. या पाच राज्यातील सर्वात महत्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. यूपीमध्ये भाजप जवळपास 239 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर समाजवदी पार्टी यूपीमध्ये 108 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय.
Manipur Election Result 2022 : मणिपूरमध्ये भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल; भाजप 22 जागांवर, काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर
Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 382 मतांनी आघाडीवर
Goa Election Result Live : गोवा : भाजपचे विश्वजीत राणे आणि त्यांची पत्नी देविया राणे मोठ्या फरकाने आघाडीवर; प्रत्येकी पाच आणि आठ हजार मतांनी आघाडीवर
Election Result 2022 LIVE: उत्तराखंडमध्ये भाजपची सत्तेकडे वाटचाल; 43 जागांवर आघाडी तर काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 Updates : गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. इथे काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या फेरीअखेर फक्त 940 मतं मिळाली आहेत. बरीच वर्ष आदिती सिंह राहुल ब्रिगेडचा युवा चेहरा होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. अमेठीत पहिल्या फेरीअखेर सपा उमेदवार 1100 मतांनी आघाडीवर आहेत. तिथे काँग्रेस उमेदवाराला फक्त 477 मतं मिळाली आहेत.
Election Result 2022 LIVE: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला; भाजपने 203 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, समाजवादी पक्षाने 100 जागांवर आघाडी घेतली.
मणिपूरमध्ये भाजप 15 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर एनपीपी 9 जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये एकूण विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यामध्ये जो पक्ष 31 जागांवर विजय संपादन करेल त्या पक्षाचे मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
Uttarakhand Election Result 2022 LIVE: उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस सुरू आहे. दोन्ही पक्ष सध्या प्रत्येकी 34 जागांवर आघाडीवर आहेत.
Election Result 2022 LIVE: उत्तर प्रदेशमध्ये भाजप 150 जागांवर आघाडीवर, तर समाजवादी पक्षाकडे 82 जागांची आघाडी
पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले उत्पल पर्रिकर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. भाजपने त्यांना पणजीतून तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
Election Result 2022 LIVE: गोवा: पोस्टल मतमोजणी नंतरचा कल हाती; काँग्रेस 16, भाजपा 20 जागांवर आघाडीवर
उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 28 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाची सत्ता येईल हे आत्ता सांगता येत नाही.
सध्या मिळलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी 34 जागांवर आघाडीवर आहे. मोठी आघाडी आम आदमी पार्टीने घेतली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात तेथील काही निकाल हाती येणार आहेत.
Election Result 2022 LIVE: उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस; दोन्ही पक्षांना प्रत्येकी 27 जागांवर आघाडी
Election Result 2022 LIVE: पोस्टल मतमोजणीनंतर आता ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर
Election Result 2022 LIVE: उत्तर प्रदेशमध्ये भाजपची 100 जागांवर आघाडी, तर समाजवादी पक्षाची 50 जागांवर आघाडी
Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशमधील 135 जागांचे कल समोर; भाजप 80 तर समाजवादी पक्ष 50 जागांवर आघाडीवर; काँग्रेस आणि बसपा दोन जागांवर आघाडीवर
Election Results LIVE : उत्तराखंडमध्ये भाजप 17 आणि काँग्रेस 11 जागांवर पुढे
UP Election Result 2022 Live Updates : भाजप 40 जागांवर आघाडीवर, समाजवादी पक्षाला 27 जागांवर आघाडी
UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजप 25 जागांवर आघाडीवर, सपा 18 जागांवर आघाडीवर, सुरुवातीचे कल हाती
पंजाबमध्ये पहिला कल अकाली दलाच्या बाजूने
UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजप 11 जागांवर आघाडीवर, सुरुवातीचे कल हाती
उत्तराखंडमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने आला आहे. उत्तराखंडमध्ये भाजजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर समाजवादी पार्टी सहा जागांवर आघाडीवर आहे.
Election Result 2022 Live Updates : काही क्षणात पहिला निकाल येणार, पोस्टल मतमोजणीला सुरुवात, निकालाआधीच अनेक ठिकाणी सेलिब्रेशन सुरु
आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वमीवर गोव्यात काँग्रेसने विशेष खबरदारी घेतली आहे. आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या निवडणुकीतील उमेदवारांना हॉटेवरच ठेवलं जाणार आहे. उमेदवारांना मतमोजणीसाठी बाहेर सोडलं जाणार नाही. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये मडगाव इथं झालेल्या बैठकित निर्णय झाल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. तर अपेक्षित उमेदवार निवडून आल्यास इतरांच्या मदतीने भाजप देखील तत्काळ सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
UP Election Result 2022 LIVE : सर्वात मोठा निकाल उत्तर प्रदेशचा, कोण बाजी मारणार? काही क्षणात कळणार कल... #ElectionResults #ResultsOnABP #UPElectionResult2022
Goa Assembly Result 2022 Live : गोवा: काँग्रेस आमदार फुटू नयेत म्हणुन काॅग्रेसची विशेष रणनिती; काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या निवडणुकीतील उमेदवारांना हॉटेलवरच ठेवलं जाणार, उमेदवारांना मतमोजणीसाठी बाहेर सोडलं जाणार नाही
पाच राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे....विजयाची खात्री बाळगत जवळपास सर्वच पक्षांची कार्यालय सजली आहेत. पाचही राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या उमेदवारांच्या घरी जल्लोषाचे वातावरण तयार झाले. मात्र दिल्लीतील काँग्रेस भवनमध्ये अजूनही शांतता पाहायला मिळते... कोणताही नेता किंवा एकही कार्यकर्ता या कार्यालयाकडे फिरकला नाही...
Election Result 2022 : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.
Election Result Live : मतमोजणी सुरू होण्यासाठी अवघा एक तास शिल्लक; सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी सुरू होणार; ८.३० वाजता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होणार
Uttarakhand Election Result : उत्तराखंडमध्ये सत्ता भाजप की काँग्रेसकडे ? काही तासात निकाल होणार स्पष्ट
Goa Election Result : गोव्याच्या सत्तेत बदल होणार? मतमोजणीपूर्वीच भाजप, काँग्रेसकडून आघाडीची चाचपणी सुरू ; एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू लोकसभेचा अंदाज
Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एक्झिट पोलमध्येत सत्ताधारी भाजपला सुमारे 240 जागा आणि सपा-आरएलडी आघाडीला सुमारे 140-150 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Election Result 2022 LIVE : पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
Election Result 2022 LIVE : देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
Election Result 2022 : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.
पार्श्वभूमी
5 State Election Results 2022 LIVE: राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.
देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं.
पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -