Goa Election Result 2022 Live Updates : गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस

Goa Election Results 2022 Live Updates : भाजप सत्ता कायम राखणार की, काँग्रेस सत्तेत येणार? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा? अचूक निकाल पाहा एबीपी माझावर...

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 10 Mar 2022 05:38 PM

पार्श्वभूमी

Goa Election Results 2022 Live Updates :  आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result 2022) जाहीर होणार आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान,...More

Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदारसंघात 500 मतांनी विजयी

Goa Election Result 2022 :  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले.  गोवा विधानसभा निवडणुकीत  (Goa Assembly Election Result 2022) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोवा भाजपने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने देखील भाजपला पाठिंबा दर्शविला आहे.