एक्स्प्लोर

अजित पवार, एकनाथ शिंदेंचा फायदा ते लोकसभेत झालेल्या चुका, भाजपा-संघ परिवारात विस्तृत चर्चा, नागपूरच्या बैठकीत विधानसभेची स्ट्रॅटेजी ठरली?

संघ परिवाराच्या दिवसभर चाललेल्या या समन्वय बैठकीत भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या बैठकीत संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर भाजपाने विस्तृतपणे महाराष्ट्रातील परिस्थिती ठेवली आहे.

नागपूर : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत मतांची घटलेली आकडेवरी आणि अनेक जागांवर बसलेला फटका लक्षात घेता यावेळी महायुतीचे घटकपक्ष जपून पाऊल टाकत आहेत. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांशी भाजपाची चर्चा चालू आहे. बैठकांच्या माध्यमातून भाजपा आणि संघ परिवार यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर रणनीती आखण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 9 ऑगस्ट रोजी भाजपा आणि संघ परिवारातील वेगवेगळ्या 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठक त भाजपाच्या वतीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. 

संघ परिवाराच्या दिवसभर चाललेल्या या समन्वय बैठकीत भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ते अखेरच्या सत्रात संध्याकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर भाजपाने विस्तृतपणे महाराष्ट्रातील परिस्थिती ठेवली आहे. या बैठकीत प्रामुख्याने 2019 साली भाजप आणि शिवसेना वेगवेगळे झाल्यानंतर कोणत्या परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सोबत घ्यावं लागलं याची राजकीय कारणमीमांसा करण्यात आली. 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं, तेव्हा भाजप सर्वांत मोठा पक्ष असतानाही भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी नव्हती परिस्थिती नव्हती, अशी चर्चा या बैठकीत झाली.  

बैठकीतील प्रमुख मुद्दे, भाजपाने बैठकीत काय सांगितलं?

>>> भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याची स्थिती नसल्यामुळे आधी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आलं.तरी दोघांच्या मताची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नसल्याने अजित पवार यांनाही सोबत घेण्यात आलं. 

>>> भाजपच्या अनेक कोअर मतदारांनातसेच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणे रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचे वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं 

>>> लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवार यांना सोबत घेतल्याचा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला फार फायदा झालेला नाही 

>>> लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मत एकनाथ शिंदे यांना 89% ट्रान्सफर झाले, तर शिंदेंचे 88% मते भाजपाला ट्रान्सफर झाले आहेत.

>>> भाजप आणि अजित पवार यांच्यामधील वोट ट्रान्सफरेबिलिटी मात्र 50% पेक्षा कमीच आहे. 

>>> एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली आहे. 2019 ते 2022 दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना कामाचे सातत्य तुटले होते, ते पुन्हा सुरू करता आले आहे.

>>> लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपामधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचे आकलन केले. मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावे असे ठरले. 

>>> भाजपाने बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख अशी निवडणुकीची लांबलचक यंत्रणा उभी केली होती. मात्र या यंत्रणेत महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्यामुळे भाजपाला फारसा फायदा झालेला नाही. 

>>> लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून हे लक्षात आलंय की सध्याच्या काळात उमेदवार अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपाचे जेवढे ही खासदार जिंकून आले त्यापैकी नितीन गडकरी आणि रक्षा खडसे सोडून इतर सर्व नवे उमेदवार होते. तर ज्या ठिकाणी उमेदवार बदलले गेले नाही आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली तेथे भाजपाचा पराभव झालेला आहे. 

>>> विरोधकांनी खोट्या नरेटिव्हच्या जोरावर लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात जिंकली. त्यामुळे खोट्या नरेटिव्हच्या जोरावर ते राज्य सरकारला हलवू शकतात, विधानसभा निवडणूक जिंकू शकतात, असे त्यांना वाटते. त्यामुळे रोज खोटारडेपणा सुरू आहे. 

>>> मात्र अशा खोट्या नरेटीव्हला संघ परिवाराचा विस्तृत विचार परिवार सहज पराभूत करू शकतो. त्यासाठी सर्वांनी सक्रियतेने मैदानात उतरण्याची गरज आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget