CM Nitish Kumar's Convoy Attacked: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. या दगडफेकीत काही वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेकीच्या वेळी मुख्यमंत्री नितीश ताफ्यात नव्हते. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात घडली. जिथे काही अज्ञात लोकांनी त्याच्या ताफ्यावर दगडफेक केली.


या ताफ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारीच उपस्थित होते. सोमवारी नितीश कुमार बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. ते तेथील दुष्काळी परिस्थितीबाबत बैठक घेणार असून तेथे बांधण्यात येत असलेल्या रबर डॅमचीही पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गयाला जाणार आहेत, पण हेलिपॅडवरून इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची गाडी पाटणाहून गयाला पाठवली जात होती.






दगडफेकीत काही लोक जखमी झाले


तरुणाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी पाटणा-गया  (Patna-Gaya) मुख्य मार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको केला. याच निदर्शनादरम्यान नितीश कूम यांच्या ताफ्यातील गाड्या रस्त्यावरून जाऊ लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी ताफ्यावर दगडफेक केली. त्यामुळे अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे काही जण जखमीही झाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जामनगरमध्ये प्राणीसंग्रहालय निर्मितीचा मार्ग मोकळा, रिलायन्सच्या प्राणीसंग्रहालयाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 
CJI NV Ramana : देशात झपाट्याने वाढणारे शिक्षणाचे कारखाने, आंध्र प्रदेशला निधी देण्यास केंद्राकडून विलंब, भारताच्या सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त