Dahi Handi : जय महाकाली पथकाने फोडली हिवरी नगर येथील 'महागाईची हंडी', पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचा रोख पुरस्कार

एबीपी माझा वेब टीम Updated at: 21 Aug 2022 07:07 PM (IST)
Edited By: अक्षय गांधी

महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंब, मजूरी करणारा वर्ग यांच्यावर होणारा अत्याचार समाजापुढे आणण्याच्या उद्देशाने महागाईच्या हांडीचे आयोजन करण्यात आले होते.

महागाईची हांडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे पुरस्कार रोख स्वरुपात देण्यात आले.

NEXT PREV

नागपूर:  हिवरीनगर येथे आयोजित 'महागाईची हंडी' जय महाकाली पथकांनी फोडली. वाढत्या महागाईवर लक्ष वेधण्यासाठी हिरवी नगर येथे ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केले होते. यामध्ये विजेत्या पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या दहीहंडी स्पर्धेत आदिशक्ती क्रीडा मंडळ, जय मा शितला मंडळ, जय भोलेश्वर मंडळ, जय महाकाली क्रीडा मंडळ, व राधाकृष्ण महिला मंडळाचे गोविंदा पथक सहभागी झाले होते. या स्पर्धेत आकर्षक मानवी मनोरे रचत जय महाकाली मंडळांनी  महागाईची दहीहंडी फोडली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, शेखर सावरबांधे, संदीप इटकेलवार, श्रीकांत घोगरे, ईश्वर बाळबुदे, तानाजी वनवे, वर्षा शामकुले, रमन ठवकर, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाला पुरस्कार देण्यात आले.


देशभरातील जनता महागाईचे चटके सहन करत आहेत. गृहीणींचे बजेटही बिगडले आहे. महागाईवर सरकारचे नियंत्रण नसून सरकार फक्त कर वाढवून नागरिकांची लूट करत आहे. सरकारने नुकतेच लादलेल्या जीएसटीमुळे सामान्य नागरिकाला पुन्हा महागाईची कळ लागली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचे प्रतिबिंब म्हणून आम्ही 'महागाईची हंडी' आयोजित केली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले.


राधाकृष्ण महिला मंडळाला आकर्षक पुरस्कार


तसेच राधाकृष्ण महिला मंडळाच्या पथकाला लक्ष्मीकांत सावरकर यांच्यातर्फे आकर्षक पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राविनिश पांडे, प्रशांत बनकर, रियाज़ शेख आकाश थेटे, विनोद निनावे,सुनील मस्के, प्रकाश मेश्राम, राहुल  नारनवरे,अश्विन जवेरी, कपिल आवारे, अमित जेठे, पवन गावंडे, निलेश बोरकर, शरद शाहू, अमरीश ढोरे, रुपेश बागडे, विलास पैठणकर, गणेश आटे, कपिल शराफ, लोकेश सतीबावणे, राजेंद्र भोयर, मिलिंद वाचनेकर, राजेश पाटील, प्रकाश उपाध्यय, देवेंद्र गरडे, अनंत रंगारी, अनिल शेख,प्रशांत वांधरे, जय चावला, दीपक सलुजा, इकबाल शेख,  अफजल शेख, नरेंद्र साळवे, सुशांत पाली, आशुतोष बेलेकर,वसीम लाला, सचिन बोरकर, राहुल पेठे,  राजू मोरे, पिंटू मेश्राम, आकाश चिमणकर, या कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.



घर चालविण्यासाठी घरातील प्रमुख दिवसरात्र परीश्रम घेत असतात. कुटुंबाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये म्हणून आपली इच्छा विसरुन मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. याची जाणीव तरुणांना व्हावी आणि या महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंब, मजूरी करणारा वर्ग यांच्यावर होणारा अत्याचार समाजापुढे आणण्याच्या उद्देशाने महागाईच्या हांडीचे आयोजन करण्यात आले होते. देशातील युवक आता जागे झाला असून आता सत्तेच्या मग्रुरीत असलेल्या सरकारला त्याची जागा दाखवणार असल्याचे कालच्या गर्दीतून स्पष्ट दिसून येत आहे.- दुनेश्वर पेठे,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  शहर अध्यक्ष

Published at: 21 Aug 2022 07:07 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.