Nanded News: शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांवर टीका केल्या जात आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनात बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, असे म्हणत शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आमचे सरकार आले असून, आम्ही ओक्के आहोत, त्यामुळे शेतकरीही ओक्के होतील असा टोला सत्तार यांनी चव्हाण यांना लगावला आहे. 


अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमचे सरकार येऊन केवळ 45 दिवस झाले आहे. मात्र त्यांचे सरकार अनेक वर्षे होते. त्यांची त्यावेळी जबाबदारी होती की, शेतकरी ओक्के व्हायला पाहिजे, पण तो केला नाही. तर आता आमचे सरकार आलेय, आम्ही ओक्के आहेत, तर शेतकरीही ओक्के होतील याची काळजी त्यांनी करू नये, असे प्रतिउत्तर सत्तार यांनी दिलय.


कृषी विभागातील रिक्त पदांची भरती...


यावेळी पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, कृषी विभागात पहिल्यांदा रिक्त पदांची भरती केली जाईल व त्यानंतरच कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. दरम्यान पहिले रिक्त जागा भरू व नंतरच कृषी सेवकांचा मान व धन कसा वाढवता येईल याचा विचार करू असे सूतोवाच राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेड येथे केले आहेत.


भाजप नगरसेवकांच्या आरोपाला उत्तर...


अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील सिल्लोड नगरपरिषदेत भाजप नगरसेकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असून, त्यांचे काम होऊ दिली जात नसल्याचा आरोप भाजपच्या एका नगरसेविकेने केला आहे. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देतांना सत्तार म्हणाले की, सिल्लोड येथे माझे 28 नगरसेवक असून भाजपचे फक्त दोन नगरसेवक आहेत. कोणत्याही गोष्टीसाठी सूचक अनुमोदन असतो, त्या दोन भाजप नगरसेवकांना बोलण्यासाठी कदाचित सूचक आणि अनुमोदक नसेल, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा. तर शेवटचा खेळ खेळणारे दुसरेच असतात असे, सत्तार म्हणाले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Nanded News : शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊनच पंचनामे करा; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश


Aurangabad: दानवेंनी निधी दिला, पण सत्तारांच्या मतदारसंघात ना हरकत मिळेना; भाजप नगरसेविकेचा राजीनामा