एक्स्प्लोर

सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, तर सोलापूरात शरद पवार गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढणार

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग वाढलं असून महाविकास आघाडीतील पक्षगळती कायम असल्याचं चित्र आहे.

Maharashtra Politics: लोकसभेच्या विजयानंतर महायुतीला सोडून महाविकास आघाडीत गेलेले अनेक नेते आता घरवापसी करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकाटे यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभेनंतर संजय बाबा कोकाटे (Sanjay Baba Kokate) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते.  आता पक्षांतर्गत गटबाजीला आणि पक्षसंघटनेतील निष्क्रीयतेला वैतागून संजय कोकाटे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. संजय कोकाटेंच्या सोडचिठ्ठीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह काही पदाधिकारी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग वाढलं असून महाविकास आघाडीतील पक्षगळती कायम असल्याचं चित्र आहे. 

संजय कोकाटेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

लोकसभेच्या विजयानंतर महायुतीला सोडून महाविकास आघाडीत गेलेले अनेक नेते आता परत घर वापसी करू लागले असून सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकाटे यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत आज शिंदे सेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. संजय बाबा कोकाटे हे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. यामुळे पवार गटाला माढा विधानसभा जिंकण्यात मोठी मदत झाली होती. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्ष संघटनेतील निष्क्रियतेला वैतागून संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. आज ते मुंबई येथील मुक्तगिरी बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  संजय कोकाटे यांच्या जाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात असून माढा विधानसभेसह माढा लोकसभेत संजय कोकाटे यांची मोठी ताकद आहे.

सांगलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार

सांगलीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून, पक्षाला सांगली जिल्ह्यात खिंडार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. शिवसेनेतील फुटींनंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसते आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुख संजय विभूते युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख श्री ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

हेही वाचा:

Vidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, देवेंद्र फडणवीसांनी मांडला प्रस्ताव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Doctor Case:प्रशांत बनकर,गोपाळ बदने यांच्याविरोधात गुन्हा, कारवाईसाठी टीम रवाना - तुषार दोषी
Satara Doctor Case : 'राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळे बहिणीनं जीवन संपवलं', भावाचा गंभीर आरोप
Satara Doctor Case : फलटण प्रकरणातील दोन्ही पोलिसांना निलंबित करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
Satara Doctor Case : पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव होता - मुलीचे काका
Satara Doctor Case: सातारा डॉक्टर प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार, कठोर कारवाई करणार - चाकणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
Nashik Crime: नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Virat Kohli : विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
Embed widget