Bhavana Gawali Press Conference : "प्रचाराला निघाले नाही, म्हणून मी नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण मला स्पष्ट करायचय की, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही. मला खंत जरुर वाटली. मी इतके वर्ष काम केलं आहे, आणि इतके वर्ष काम केल्यानंतर एकदम कसेकाय असे होऊ शकते? अनेक जण 5 वेळा किंवा 3 वेळा निवडून आले. त्या खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली. त्यामुळे मला खंत वाटली. कदाचित थोडसं खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. शिवसेनेसाठी आमच्या घरासाठी योगदान दिलं आहे. एकनाथ शिंदेंची हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे", असे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी म्हणाल्या. गवळी यांनी लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. 


ठरवलं असत तर मला अनेक पद उपभोगता आली असती


भावना गवळी म्हणाल्या, मोदींचा नारा 400 पारचा आहे. त्याला आम्ही साथ देणार आहोत. आम्ही सर्व सहकारी जयश्री ताईंना विजयी करण्यासाठी घौडदौड करणार आहोत. शिवसेनेची जिल्हाप्रमुख म्हणूनही मी काम केलं आहे. मी ठरवलं असत तर मला अनेक पद उपभोगता आली असती. पण मी पदांसाठी काम केलं नाही. माझ्यासाठी काही आहे आणि काय नाही, हा माझ्यासाठी गौण विषय आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


वाशिमकर जनता माझ्या वडिलांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून ओळखते


पुढे बोलताना भावना गवळी म्हणाल्या, गेल्या 25 वर्षांपासून मी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे मी प्रतिनिधीत्व करत आले आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, 1996 मध्ये माझ्या वडिलांनी सुधाकर नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेची पताका या मतदारसंघात रोवली. त्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे, अशी मागणी माझ्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. वाशिमकर जनता माझ्या वडिलांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून ओळखते. 


यवतमाळकरांची अपेक्षा पूर्ण झाली


1999 पासून मी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असताना या जिल्ह्यामध्ये विकास करण्याची माझी जबाबदारी होती. पहिल्या रेल्वेला मी मान्यता केली. तिचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर केलं. वाशिममधून भारतात कुठेही जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात विकास केला. जमीन अधिग्रहणासाठी माझे सात वर्ष गेले. मागील दोन महिन्यांपूर्वी मोदींनी यवतमाळमध्ये आले तेव्हा, कळंब ते वर्धा रेल्वे सुरु झाली. यवतमाळकरांची अपेक्षा पूर्ण झाली. रस्त्याचे जाळं आम्ही विनलं. रेल्वे आणि हायवेचे जाळे निर्माण केले, असंही गवळी यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut on Narendra Modi : ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, संजय राऊतांचा खोचक टोला