Sanjay Raut on Narendra Modi, Chhatrapati Sambhajinagar : "ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गोल्ड मेडल मिळेल", असा खोचक टोला ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीवर जोरदार प्रहार केला.
एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे खातात, त्याची पाहा. कत्तलखण्याकडून गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांकडून 550 कोटींच्या देणग्या घेतल्या आहेत. तुम्ही म्हणत आहात की, 370 हटवले. तर काश्मिरी पंडितांची घर वापसीही झाली पाहिजे. मोदींना काश्मिरी पंडिताच दुःख समजून घेणे गरजेचे वाटले नाही. त्यांनी दुःख समजून घेतले नाही. एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते फेकू चॅम्पियन आहेत. राष्ट्रीय स्तरावर फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी आणि अंपायर म्हणून शाह घ्यावं लागेल, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
तो एवढा भयंकर चेहरा आहे की लोक घाबरायला लागलेत
देवेंद्र फडणवीस सांगतात आमच्याकडे मोदीसारखा चेहरा आहे. तो एवढं भयंकर चेहरा आहे की, लोक घाबरायला लागलेत. जसे शोलेमध्ये बच्चा सोजा वरणा गब्बर आजायेगा, असा डायलॉग आहे. तसंच मोदींचं आहे. कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील. याला भुताटकी चेहरा म्हणतात. आता हा चेहरा लोकांना नको आहे. इतकी भयंकर अवस्था या लोकांनी केली आहे. 400 पार जायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का? जनता ठरवेल मोदी ठरवू शकत नाही. मोदींनी 200 जिंकल्या तरी खूप झाल्या. मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) या वेळी बोलताना म्हणाले.
Sanjay Raut : हा चेहरा आहे की भुताटकी; संजय राऊतांची मोदींवर टीका
इतर महत्वाच्या बातम्या