Sonia Gandhi: काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या नेत्यांचे आभार मानले. त्याचवेळी काँग्रेस पक्ष देशभरात भारत जोडो यात्रा सुरू करणार असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करून त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे सांगितले.
चिंतन शिबिराच्या निर्णयांची लवकरच केली जाणार अंमलबजावणी
सोनिया गांधी म्हणाल्या की, यावर्षी गांधी जयंतीपासून भारत जोडो यात्रा सुरू होईल. या प्रवासात तरुण आणि वृद्ध सगळेच सहभागी होणार आहेत. यात्रेमुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावरही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उदयपूरच्या चिंतन शिबिरात घेतलेल्या निर्णयांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे सोनिया गांधी म्हणाल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले.
राहुल यांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. त्यात त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, आमची लढाई भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीशी आहे, ही लढाई इतकी सोपी जाणार नाही. ही विचारधारा देशासाठी अत्यंत घातक आहे. ते म्हणाले की, माझ्या प्रिय देशात इतका संताप आणि हिंसाचार पसरू शकतो, हे मी मानायला तयार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Rahul Gandhi in Chintan Shivir: काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, भाजप-आरएसएसमध्ये तसे नाही: राहुल गांधी
- Congress: राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष? चिंतन शिबिरात दिले संकेत
- Congress Chintan Shivir: काँग्रेसमध्ये 'एक कुटुंब, एक तिकीट धोरण'; उदयपूर चिंतन शिबिरात मोठे निर्णय
- Prithviraj Chavan : पक्षात कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी, राहुल गांधी पुढे येणार नसतील तर..., पाहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?