'काकांविषयी माझ्या मनात घाण', मेहबूब शेख कडाडले,अजित पवारांवर जोरदार टीका, मग बजरंग सोनावणेही म्हणाले...
अजित पवारांवर जोरदार टीका करत महाराष्ट्रातील पुतण्यांनी काकंच्या पाठीत खंजीर खुपसला असंही ते म्हणाले.
Beed: शरद पवारांनी तुम्हाला तिथं बसवलं आहे. मी खासदार झालो पण तुम्हाला तुमच्या बायकोला खासदार करता आलं नाही असं म्हणत बीडच्या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख चांगलेच कडाडले. विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केलीये. गुलाबी जॅकेट घालून लाडक्या बहिणीची चौकशी करायला गेलेल्या अजित पवारांवर त्यांनी चांगलाच निशाणा साधला असून 'गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा मी छान काका विषयी माझ्या मनात घाण' असं ते म्हणालेत. बजरंग सोनावणेंची लायकी काढली गेल्याचंही ते म्हणाले.
यावरून आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही यात उतरत धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. शिवस्वराज्य यात्रेतच तेही बोलत होते. पुणे जिल्ह्यानंतर बीड जिल्ह्यानेही शरद पवारांना साथ दिली असल्याचं सांगत बंजरंग बाप्पांची लायकी बीड शहरानं दाखवली आहे. पंकजा मुंडेंना पाडून तुम्ही खासदार झाला आहात असे म्हणत त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेवरही निशाणा साधला. अजित पवारांवर जोरदार टीका करत महाराष्ट्रातील पुतण्यांनी काकंच्या पाठीत खंजीर खुपसला असंही ते म्हणाले.
काय म्हणाले मेहबूब शेख?
राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, "शरद पवार साहेबांनी तुम्हाला तिथे बसवलं आहे मी खासदार झालो पण तुम्हाला तुमच्या बायकोला खासदार करता आलं नाही. "
लाडकी बहीण योजनेसाठी शेतावर जात महिलांची चौकशी करायला गुलाबी जॅकेटमध्ये गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ते म्हणाले, "गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा मी छान काका विषयी माझ्या मनात घाण ..महाराष्ट्रातील पुतण्यांनी काकांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचंही ते म्हणाले. सर्व प्रकल्प गुजरातला घेवून जाणार आसाल तर महाराष्ट्रात मत मागण्याचा अधिकार नाही. "
राज्यात सध्या विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. आज बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. यात आगामी विधानसभेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यातही उपमुख्यमंत्री अजित पवारांसह, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधल्याचे दिसले. दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनीही बीडच्या शिवस्वराज्य यात्रेत धनंजय मुंडेंना घेरल्याचं दिसून आलं.
काय म्हणाले बजरंग सोनावणे?
लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडेंना हरवून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही सरकारवर टीका केल्याचं दिसून आलं. निवडणूक होती लोकसभेची, तुम्ही प्रचार केला विधानसभेचा असं म्हणत त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली. कृषीमंत्र्यांनी पीक विमा द्यावा असं म्हणत कृषी विभागात ३०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. आता मान्य करा बीड जिल्ह्यानं बजरंग सोनावणेला खासदार केलं असंते म्हणाले. बजरंग सोनावणे कुठे सापडतो हे बघता पण तुम्ही विधानसभेत कुठे अडकता ते बघा असं म्हणत त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.
हेही वाचा: