Presidential Election 2022: देशात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी उभे केलेले उमेदवार यशवंत सिन्हा यांनी रविवारी सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले यशवंत सिन्हा यांनी मतदानासाठी आवाहन करताना म्हटले आहे की, ''यावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक दोन उमेदवारांमध्ये नाही, तर ती दोन विचारसरणींमधील लढाई आहे.''

Continues below advertisement


सिन्हा म्हणाले की, ते भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी या निवडणुकीत उभे आहेत, तर द्रौपदी मुर्मू यांना लोकशाहीवर दररोज हल्ले करणाऱ्यांचा पाठिंबा आहे. यशवंत म्हणाले, "मी धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी उभा आहे, जो आमच्या राज्यघटनेचा प्रस्तावना स्तंभ आहे. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार अशा पक्षाचा आहे, ज्याने हा स्तंभ नष्ट करण्याचा आणि बहुमताचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा संकल्प केला आहे."






यशवंत सिन्हा म्हणाले, "मी सहमती आणि सहकार्याच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी उभा आहे. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला संघर्ष आणि संघर्षाचे राजकारण करणाऱ्या पक्षाचा पाठिंबा आहे." ते म्हणाले, "एक राष्ट्र, एक पक्ष, एक सर्वोच्च नेता. हे थांबवायला नको का? फक्त तुम्हीच हे थांबवू शकता.'' शनिवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून सर्व आमदार आणि खासदारांना त्यांच्या बुद्धीनुसार मतदान करण्याचे आवाहन केले होते. नोकरशहामधून राजकारणी झालेले यशवंत सिन्हा यांच्याकडे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार आणि अर्थ मंत्रालयासारखी महत्त्वाची खाती होती. सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. तर गुरुवारी मतमोजणी होणार आहे.






इतर महत्वाच्या बातम्या: