Vice President Election 2022: भाजपने शनिवारी बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.


बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून 71 वर्षीय जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा होताच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची समीकरणे काय आहेत आणि धनकड यांचा विजय निश्चित आहे का, हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरणार आहे.


उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची समीकरणे काय आहेत?


देशाच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी राज्यसभा, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभा सदस्य मतदान करता. संसदेचे सध्याचे संख्याबळ 780 आहे. त्यापैकी फक्त भाजपचे 394 खासदार आहेत. विजयासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत जगदीप धनखर हे देशाचे पुढील उपराष्ट्रपती होतील, हे जवळजवळ निश्चित समजले जात आहे. 


उपराष्ट्रपतीची निवडणूक कधी होणार?


उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 2022 साठी (Vice President Election 2022) निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे. तसेच राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (President Election 2022) 18 जुलै रोजी होणार आहे आणि मतदान 21 जुलै रोजी होईल.



इतर महत्वाच्या बातम्या: