पवार Vs पवार.. बारामतीमध्ये राजकीय सामना, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही रोजगार मेळाव्याला राहणार उपस्थितीत
Baramati Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्याच्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत.
Baramati Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्याच्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. परंतु या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार या कार्यक्रमात सहभागी होणार का? हा प्रश्न आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमासाठी आपल्या नियोजित दौऱ्यात नमो रोजगार मेळावा असेल किंवा इतर कार्यक्रम असतील यासाठी वेळ राखून ठेवला असल्याची प्राथमिक माहिती आहे. येत्या दोन तारखेला बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन, बारामती बस स्थानकाचे उद्घाटन, पोलीस वसाहतीचे उद्घाटन आणि नमो रोजगार मेळाव्याचा शुभारंभ होणार आहे. विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकराच्या मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत शरद पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्या संस्थेच्या मैदानात हा रोजगार मेळावा पार पाडतो आहे त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेतस तर सुप्रिया सुळे विश्वस्त आहेत. शासनाकडून अजून कार्यक्रम पत्रिका प्रकाशित करण्यात आली नाही.पण या कार्यक्रमावर मराठा समाजावर मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रम निमंत्रण वरून सरकारला चिमटे काढले आहेत.
तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार -
येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. निमित्त आहे पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचे. हा रोजगार मेळावा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचे, पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे.
मराठा बांधवाचा बहिष्कार -
सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत या कार्यक्रमावर मराठा बांधवानी मात्र बहिष्कार टाकला आहे. मराठा समाजाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. जर मनोज जरांगे पाटील यांनी नेत्यांना गावबंदी सूचना दिल्या. तर मात्र एकही राजकीय नेत्यांना फिरू देणार नसल्याची भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.
सुप्रिया सुळेंना आमंत्रण नाही -
बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे, ही संस्था 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे पण या शासकीय कार्यक्रमाचे आमंत्रण अद्यापही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आलं नाही.
लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग -
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत. तसेच पाच जिल्ह्यातील युवक युवती रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा शासनाचा असला तरी या कार्यक्रमात राजकिय भाषणं होणार आणि यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाणार का? हे पाहणं महत्वाचे आहे.
शासकीय कार्यक्रम हा राजकीय आखाडा होणार का?
बारामती ही पवारांचीच हे समीकरण गेली पासष्ट वर्षे कायम राहिलंय. काळाच्या ओघात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कितीही बदल झाले तरी पवारांचा हा गड अभेद्य राहिलाय. भाजपने मिशन बारामती आखले होते पण ते मिशन अजित पवार पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांना पडण्याचा चंग महायुतीने बांधला असतानाच नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. नमो रोजगार मेळावा हा शासकीय कार्यक्रम हा राजकीय आखाडा होणार का? या मेळाव्यावर मराठा समाजाचे सावट कायम असणार आहे..