पुणे : बारामतीत (Baramati Lok Sabha Election) विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहेत तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केलाय.
भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. तणावातून वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले.
घडलेल्या प्रकरानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. संतप्त कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एवढ्या मध्यरात्री गावात तुमचे काम काय आहे? अशी ग्रामस्थांकडून विचारणा देखील करण्यात आली आहे.
तसेच वेल्हेतील जिल्हा मध्यवर्ती बँक ही रात्री 12 वाजले तरी बँक सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू आहेत, असे म्हणत रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. रात्री 12 वाजता बँका सुरू असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला आहे.
आज बारामतीमध्ये मतदान होणार आहे. तत्पूर्वी 5 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून येथील प्रचार थांबलाआहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी बारामतीत थेट लढत आहे.
बारामतीचं राजकीय वातावरण तापलं
राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे यंदा बारामतीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.बारामती हा पवारांचा बालोकिल्ला आहे. राष्ट्रवादी फुटल्यामुळे यंदा बारामतीत काका आणि पुतण्या आमने-सामने उभे ठाकले आहेत. आपल्या लेकीच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठीबारामतीमध्ये शरद पवार तसेच संपूर्ण पवार कुटुंबीय सर्वस्व झोकून सभा घेताना दिसले. आता बारामतीचा मतदार कौल कोणाला देणार हे आता 4 जूनला स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा :